तेलाविषयी अनेक समज-गैरसमज आजही कायमआहेत. त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे तेल आरोग्यास घातक असते. कारण तेलामध्ये चरबी असते. ती शरीरात साचत गेली की, जाडी वाढते. या गोष्टी काही अंशी खर्‍या असल्या तरी तेल शरीरासाठी काही बाबतीत आवश्यक असते. कारण तेलातील चरबी शरीराला घातक नसून योग्य प्रमाणात घेतली तर हृदयाला बळकटी देते. म्हणूनच तेलाविषयीचे गैरसमज काढून टाकले पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात…

● तेल शरीराला उपयुक्त असते, मात्र ही गोष्ट आपण कोणते तेल वापरतो यावर अवलंबून असते.
● भाताच्या तुसापासून काढलेले तेल, सूर्यफुलाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल सारखी तेले हृदयासाठी उपयुक्त आहेत. कारण यामध्ये आवश्यक ती पोषण द्रव्ये आहेत. ते शुद्ध स्वरूपात वापरल्यास त्यापासून धोका होत नाही.

● सूर्यफुलाचे तेल साधारणत: स्वयंपाकासाठी वापरत नाहीत. मात्र यामुळे हृदरोगापासून बचाव होऊ शकतो. हे तेल हृदयाचे क्रियाकलाप व्यवस्थित चालविण्यास सहाय्य करते. या तेलातील ओमेगा-3 हे द्रव्य अनेक बाबतीत उपयुक्त आहे.
● शेंगदाण्याचे तेल आणि खोबर्‍याचे तेल अजिबात वापरू नये, अशीही सूचना आहार तज्ज्ञांकडून केली जात असते

from https://ift.tt/3fXwxEq

By News

Leave a Reply

Your email address will not be published.