मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे. 
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की,राज्यातील रुग्ण संख्येतील 86 टक्के रूग्णांना सौम्य लक्षणे आहेत आणि हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर उर्वरीत 14 टक्क्यांमध्येही केवळ 2.8 टक्के रूग्ण गंभीर वर्गवारीत आहे अशी माहिती देखील राजेश टोपेंनी दिली आहे. यासोबतच बुधवारी राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘ बुधवारी राज्यात अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 2 लाख 45 हजार झाली आहे. मात्र असे असले तरी दिलासा आहे. कारण 86 टक्के लोक होम क्वारंटाइन आहेत. त्यांना सर्दी-खोकला एवढीच लक्षणे दिसत आहेत. उर्वरित 14 टक्के जे रूग्णालयात आहेत यामधील केवळ 0.9 टक्के रूग्ण आयसीयूत आहेत. व्हेंटिलेटरवर 0.32 टक्के, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर 0.59 टक्के रुग्ण आहेत. तर केवळ ऑक्सिजन बेड असलेल्या ठिकाणी 1.89 टक्के रूग्ण आहेत.’ यामुळे धोका कमी आहे.
📌 सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन
आता सेल्फ किटद्वारे देखील कोरोना चाचणी करणे शक्य झाले आहे. यामुळे अनेक लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. अशा वेळी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असला तरी यांची माहिती ते संबंधित विभागाला कळवत नाहीत. अशा लोकांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्त त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्यावे. केवळ तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल करण्यात येतील आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल. असे देखील टोपे म्हणाले आहेत.

from https://ift.tt/3tohcEA

By News

Leave a Reply

Your email address will not be published.