जालना : चीनसह आशियाच्या एका मोठ्या भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा पसरण्यास सुरूवात झाली आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांत जेवढे रुग्ण सापडले नव्हते, तेवढे दररोज सापडू लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जगात पुन्हा कोरोना डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठी झळ बसलेल्या भारताने कोरोना प्रतिबंधक उपायांची तयारी सुरु केली आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केले.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की,”चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. दक्षिण कोरियामध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीत, रस्त्याच्या दुतर्फाही रुग्णांना ठेवलं जात आहे अशी परिस्थिती पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर पुढच्याला ठेच, मागचा सावध या म्हणीप्रमाणे आपल्यालाही काळजी घेणे आवश्यक आहे. केंद्र शासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. राज्य शासन केंद्राच्या अनुषंगाने कारवाई करेल,” असेही राजेश टोपे म्हणाले. चौथ्या लाटेबद्दल बोलताना त्यांनी आपल्याला काळजी घेत राहिलं पाहिजे, असे सांगितले.

from https://ift.tt/jdEmo17

By News

Leave a Reply

Your email address will not be published.