जग डेल्टाच्या जाचातून सावरत असतानाच कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटने हैराण करून सोडले आहे. कारण हा व्हेरियंट अधिक घातक असल्याचे बोलले जात आहे. चला, तर याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
▪लक्षणे काय? : दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) नुसार, या प्रकारात अद्याप कोणतीही असामान्य किंवा नवीन लक्षणे दिसली नाहीत. याचा अर्थ ओमिक्रॉनचा संसर्ग देखील मागील प्रकाराप्रमाणेच लक्षणे दर्शवित असेल. जसे कि, ताप, खोकला, वास किंवा चव कमी होणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे.
▪ओमिक्रॉन अधिक घातक? : डब्ल्यूएचओच्या मते, ओमिक्रॉन हा कोरोनाच्या जुन्या प्रकारापेक्षा वेगाने पसरत असल्याने ती जास्त प्राणघातक ठरू शकतो. ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी अगोदरपासूनच वापरल्या जाणाऱ्या पीसीआर चाचणीची मदत घेतली जात आहे. प्रयोगशाळांनी असे सूचित केले आहे की, पीसीआर चाचणीमध्ये तीन लक्ष्यित जनुकांपैकी एकही शोधला जात नाही. ज्याला एस जीन ड्रॉपआउट किंवा एस जीन टार्गेट फेल्युअर असेही म्हणतात.
▪लस किंवा बूस्टर डोस प्रभावी आहे का? : ओमिक्रॉन या प्रकाराविरूद्ध लस प्रभावी आहे की नाही? याबाबत लस उत्पादकांना शंका आहे. हे शोधण्यासाठी फायझर आणि बायोएनटेक यांनी संशोधन सुरू केले आहे. एका रिपोर्ट्सनुसार, ओमिक्रॉनचा लस किंवा बूस्टर डोस घेतलेल्या अनेक लोकांना संसर्ग झाला आहे.

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *