पारनेर : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री.क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान या राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्राला आयकर विभागाकडून ८० जी खालील प्रमाणपत्र नुकतेच देण्यात आले आहे, दि.२१/३/२०२२ पासून ते असेसमेंट वर्ष २०२४-२५ पर्यंतचे देण्यात आले आहे.त्याचा युनिक क्रमांक AAKTS 5699 BF 20229 असा आहे.
श्री.खंडोबा देवस्थानला देणगीदारांकडून आयकर विभागाच्या ८०जी खालील देणगीवरील देवस्थानकडील आयकर वजावटीच्या सवलतीबाबत सतत विचारणा होत होती परंतु देवस्थानला मूळ घटनेतील धार्मिक उद्देशामुळे आयकर विभागाकडून ८० जी प्रमाणपत्र देवस्थानला मिळाले नव्हते. दरम्यानच्या काळात देवस्थानच्या घटनेतील धार्मिक उद्देशामध्ये वाढ करून सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व चॅरिटेबल उद्देश सहाय्यक धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांचेकडून मंजूर करून घेण्यात आले.
त्यानंतर ऑनलाईन प्रस्ताव व माहिती आयकर विभागाला देऊन आयकर कलम १२ ए आणि कलम ८० जी बाबत प्रमाणपत्र मिळणे कामी पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर दिनांक १३/३/२०२२ रोजी आयकर कलम १२ ए आणि दि. २१/३/२०२२ रोजी आयकर कलम ८० जी खाली देवस्थान न्यासाची नोंदणी होऊन प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने देवस्थानला प्राप्त झाले आहे.त्यामुळे श्री खंडोबा देवस्थान भक्त व देणगीदारांना यापुढे देवस्थानला ८० जी खालील उद्देशयांना दिल्या जाणाऱ्या देणगीवर कर वजावट सवलत उपलब्ध झाली आहे. त्यानुसार भाविक भक्त, देणगीदार,यात्रेकरू, अन्नदाते व्यक्ती, संस्था यांनी देवस्थानला देणगी देऊन सहकार्य करावे.आशा देणगीदारांना आयकर वजावट सूट मिळण्याचा आयकर कलम ८० जी खालील सवलतीचा लाभही घेता येईल असे निवेदन देवस्थानच्या वतीने अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,सचिव महेंद्र नरड,खजिनदार हनुमंत सुपेकर, सहसचिव मनिषा जगदाळे ,विश्वस्त किसन धुमाळ,आश्विनी थोरात,अमर गुंजाळ,चंद्रभान ठुबे,किसन मुंडे, मोहन घनदाट,बन्सी ढोमे, दिलीप घोडके, देविदास क्षीरसागर, साहेबा गुंजाळ यांनी केले आहे.

from https://ift.tt/uVLWTKv

By News

Leave a Reply

Your email address will not be published.