अमक्याने असं वर्तन केलं म्हणून मी असं वर्तन करतो,तमक्याने तसं केलं म्हणून मी असंच वागतो.अशी विधानं आपल्या मुखातून कधीतरी निघतातच.समाजाची जीवनपद्धती आपलं जगणं ठरवत असते.कारण आपणही समाजाचाच भाग आहोत. इतरांकडे पाहून जगणारी माणसं बहुसंख्य आहेत.मग स्वतःला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी माणसं कुठुन येतात? ती ही समाजाचाच एक भाग आहेत.
(ads1) 
स्वतःला शोधणारी माणसं आपोआपच वेगळी वाट निवडतात.त्यात आत्मकल्याणासोबतच समाजकल्यानाचाही विचार असतो.अर्थिक दुर्बलता चोऱ्या करुनही घालवता येते.घर बायका मुलांचा प्रपंच चोराला,पापी मनुष्यालाही असतो.
संत तुलशीदास म्हणतात,
सुत दारा अरु लक्ष्मी पापी घर भी होय।
संत समागम हरि कथा तुलशी दुर्लभ दोय।।
(ads1) 
स्वांकुरण ही मनुष्यातली विषेश क्रिया आहे.प्रपंचालाच सर्वस्व समजुन जगाल तर करोडो मोलाचा देह असाच वाया जाईल.आपल्या जगण्याला आधी अर्थ प्राप्त करुन देण्यासाठी आत्ममंथन करावे लागेल.मग आपोआपच इतरांना आनंद वाटता येईल. शिवाय आपण कुणासाठी काहीतरी चांगलं करु शकल्याच्या भावना शरीरात पोषक रसारणांचं निर्माण करुन निरोगी आणि आनंदी जीवन बहाल करतं ते वेगळच.
(ads1) 
चांगल्या गोष्टींचं अनुकरण व्हायला हवं पण त्यात आपलं काहीतरी खास पडायला हवं.त्यातून अधिक चांगली गोष्ट जन्माला यायला हवी.त्यात स्वांकुरणाची झलक दिसायला हवी.नुसती आर्थिक जमवाजमव जीवनाला सुबत्ता प्राप्त करुन देईलही पण ते जगणं अर्थहीन आहे कारण त्यासोबत आत्मनिवेदन नाही. त्यामुळे आत्मकल्याणाचा मार्ग त्यातुन मिळणे मोठे कठीण आहे. स्वत्वाचा शोध या सगळ्याच्या पुढचा आहे. तेच जीवन सत्यानंद देणारं असेल.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/DpMPS0X

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *