प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे गांधारी.गांधारीने अंध असलेल्या धृतराष्ट्राशी लग्न केलं.पतीवरची निष्ठा व्यक्त करण्यासाठी तीनेही डोळ्यावर पट्टी बांधली आणि झाकल्या डोळ्यांनी सारी वातावत पहात राहिली. न रहावुन शेवटी शंकराधनेने मिळालेला वर दुर्योधनाला वज्रदेही करण्यासाठी खर्च केला.पण सारं व्यर्थ झालं.
सतरा अक्षौहिनी सैन्य मारलं गेलं.कौरवही भुईसपाट झाले.

पुढे गांधारीचं काय झालं?असं वाटतच.पण गांधारी कळाली नाही की हे भोग प्रत्येकाच्या वाट्याला येतातच.आमचा मोह हिच गांधारी आहे. अति मोहाने अंधप्रेम जन्माला येते.
दृष्यमय जगतात जगण्यासाठी दृष्टी जशी गरजेची आहे तशीच ज्ञानदृष्टीही गरजेची आहे. मुलांपासून सौख्य निर्माण व्हावं,मुलं पराक्रमी व्हावीत,जगज्जेती व्हावीत असं कुणाला वाटत नाही?प्रत्येक आईबापाची ती एक सुप्त इच्छा असते. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सारा खटाटोप सुरू आहे. अनेकजन कर्ज काढुन,जमिनी विकुन,काबाडकष्ट करुन मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि तसे केलेही पाहिजे. पण लक्षात ठेवा एक वेळ बाप आंधळा असला तर चालेल पण मातृत्व आंधळं असता कामा नये.
मुलाचे कुप्रताप कळण्यासाठी बापाला डोळ्यांची गरज भासत नाही. पण आई जर पुत्रप्रेमात आंधळी झाली तर तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे समजा.मुलांच्या चुकावर पांघरूण घालणारी आई प्रत्येक घरात पहाता येईल. पण त्यालाही मर्यादा असतात,हे ज्यांना कळते ते गांधारी जन्मु देत नाहीत.आपला मुलगा चुकतो आहे हे जी आई ठणकावून सांगेल ती अर्जुन जन्माला घालेल हे निश्चित समजा.कोण आहे अर्जुन? पाहु उद्याच्या भागात.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3qUaN1h

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *