
केस धुताना अनेकदा काही चुका होतात आणि त्याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यामुळे अचानक केस कोरडे व्हायला लागतात, कधी खूप कोंडा होतो तर कधी केस तुटतात. आता केस धुताना अशा कोणत्या चुका होतात? ते पाहूयात…
● योग्य पद्धत : केसांना शॅम्पू करण्याआधी वाफ द्या. यामुळे केस खराब होण्यापासून वाचतील. तसेच केस धुण्यासाठी खूप गार पाणी किंवा खूप गरम पाणी घेणे टाळा. सामान्य तापमानाच्या पाण्याने केस धुवा. रोजच्या रोज केस धुणे योग्य नाही, आठवड्यातून जास्तीत-जास्त दोन वेळा केस धुवा.
● कंडीशनर वापरताना : शॅम्पू झाल्यानंतर केसांना कंडीशनर लावल्याने केस मुलायम होतात. मात्र कंडीशनर जास्त प्रमाणात लावल्यास केस खराब होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच कंडीशनर लावताना तो केसांच्या मूळांशी लागणार नाही याची काळजी घ्या.
● केस वाळवताना : कॉटनच्या टॉवेलने केस योग्य पद्धतीने वाळवा. यामुळे केसांची आर्द्रता टिकून राहील. ते तुटण्यापासून वाचतील. केस टॉवेलने जोरजोरात रगडू नका. अशाने ते तुटण्याची, कोरडे होण्याची समस्या निर्माण होते. अनेकदा केस वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर केला जातो. मात्र ड्रायरमुळे केसांना हिट लागून केसांचा पोत खराब होतो.
● हेअर केअर उत्पादन वापरताना : विविध प्रकारचे सिरम, जेल, हेअर स्प्रे यांमुळे केसांचा पोत खराब होतो. त्यामुळे अशाप्रकारची उत्पादने वापरताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच वापरा.
● केस धुण्याची वेळ : थंडीच्या दिवसांत गरम पाणी अंगावर चांगले वाटत असल्याने आपण केस बराच वेळ धुवत राहतो. मात्र त्यामुळे केस स्वच्छ न होता कमकुवत होतात, तुटतात.
from https://ift.tt/3Af7gP7