महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी भारत सरकारने मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली. यानेतंर्गत देशातील प्रत्येक राज्यात 50 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते आहे. या योजनेचा फायदा घेऊन महिला स्वावलंबी बनू शकतात.

या योजनेचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना घेता येऊ शकतो. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. जसे की, महिलांचे वय 20 ते 40 वयोगटातील असणं बंधनकारक आहे. तसेच अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
आवश्यक कागदपत्रे : अर्जासोबत आधार कार्ड, जन्मदाखला, आयकर प्रमाणपत्र, ओळखपत्र, दिव्यांग असेल तर त्याचे प्रमाणपत्र, शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो.
योजना कोणत्या राज्यांसाठी आहे? : महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगढ, बिहार.
असा करा अर्ज :
● सर्वात आधी भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.india.gov.in/ क्लिक करा.
● त्यानंतर याठिकाणी अर्ज डाऊनलोड करा.
● अर्जासोबत लागणारी कागदपत्रे लक्षपूर्वक जोडा.
● सर्व कागदपत्रांसह अर्ज संबंधित कार्यालयात जाऊन जमा करा.

● त्यानंतर अधिकारी त्याची पडताळणी करतील.
● त्यानंतर पात्र महिलांना या योजनेतंर्गत मोफत शिलाई मशीन दिली जाईल.
अट : या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
फ्री सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करा : https://ift.tt/Bld2NGb

from https://ift.tt/EMt1pkd

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *