केंद्रीय अर्थसंकल्प आणि काही रंजक तथ्य ! 

Table of Contents

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग चौथ्यांदा निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाशी निगडीत काही रंजक तथ्यही आहेत. जाणून घेऊयात या काही रंजक तथ्यांबाबत
▪ ईस्ट इंडिया कंपनीचे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी भारतात 7 एप्रिल 1860 रोजी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता.

 

▪ स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थ मंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला.
▪ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना दोन तास 42 मिनिटांचे भाषण दिले होते.
▪ डॉ. मनमोहन सिंह यांनी 1991 रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक शब्द होते. यात 18 हजार 650 शब्द होते.

 

▪ वर्ष 1977 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री हिरूभाई मुलजीबाई पटेल यांनी 1977 मध्ये केलेले अर्थसंकल्पीय भाषण सर्वात लहान भाषण होते, जे 800 शब्दांचे होते.
▪ माजी पंतप्रधान मोररजी देसाई यांनी 1962-69 दरम्यान अर्थ मंत्री असताना सर्वाधिक 10 वेळेस अर्थसंकल्प सादर केला.
▪ वर्ष 1999 पर्यंत अर्थसंकल्पीय भाषण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता सादर केले जात. मात्र, यशवंत सिन्हा यांनी 1999 रोजी वेळ बदलली आणि सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली.

 

▪ वर्ष 2017 मध्ये अरुण जेटली यांनी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर एक फेब्रुवारीपासून अर्थसंकल्प सादर केला जाऊ लागला.
▪ वर्ष 2017 पर्यंत रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प वेगवेगळे सादर केले जात. मात्र, 2017 मध्ये रेल्वे अर्थ संकल्प हे केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला.

from https://ift.tt/gFPwo3v7B

Leave a Comment

error: Content is protected !!