
हल्ली धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढतात. मुतखडा अर्थात किडनी स्टोनची समस्या ही त्यापैकीच एक. ही समस्या टाळायची असल्यास खालील काही पदार्थांचे सेवन टाळणे योग्य ठरेल. त्यावर एक नजर टाकूयात…
● शिमला मिरची : यात ऑक्सलेटचे क्रिस्ट्ल्स असतात. हे ऑक्सलेट क्रिस्ट्ल्स कॅल्शियमला मिळून त्यांचे कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्ट्ल्स तयार होतात. यालाच किडनी स्टोन म्हणतात. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळायची असेल तर शिमला मिरचीचे सेवन टाळा.
● टॉमेटो : याच्या बियांमध्ये देखील ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बिया काढूनच टॉमेटोचा वापर करा.
● चॉकलेट : किडनी स्टोन किंवा पोटाचे इतर विकार असल्यास ऑक्सलेटयुक्त चॉकलेटचे सेवन कमी करा.
● चहा : चहाचे अति सेवन करणाऱ्यांना किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी चहा सोडा.
● सीफूड्स : यामधून मोठ्या प्रमाणात प्यरिन्स मिळतं. यामुळे शरीरात युरीक अॅसिडचे प्रमाण वाढते. परिणामी युरीक अॅसिड स्टोन होण्याची शक्यता वाढते.
● नमकीन पदार्थ : हे किडनी स्टोनच्या समस्येला आमंत्रण देतात. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी नमकीन पदार्थांचे सेवन कमी करा.
टीप : वरील सर्व माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे, हे ध्यानात घ्यावे.
from https://ift.tt/beOupdk