
पारनेर : राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या तालुक्यातील कान्हुर पठार येथील कान्हुर पठार पतसंस्थेस उत्कृष्ट पतसंस्था म्हणुन सातव्यांदा “बँको” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
काॅसमाॅस बँकेचे उपाध्यक्ष प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा सुशिला ठुबे,उपाध्यक्ष पी.के ठुबे,कार्यकारी संचालिका नमिता ठुबे व संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.
दरवर्षी सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या विविध संस्थाची पाहणी करून विविध विभागात हे पुरस्कार प्रदान केले जातात कान्हुर पठार पतसंस्थेत ४०० ते ५०० कोटी ठेवीदार विभागात
हा पुरस्कार प्रदान केला असल्याची माहीती बँकोचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे-गुंडाळे व आयोजक अशोक नाईक यांनी दिली.
यावेळी संचालक सुभाष नवले,राजेंद्र व्यवहारे,सुहास शेळके,भास्कर ठुबे,मधुकर साळवे,संपत खरमाळे,भोमा ठुबे,भगवान वाळुंज,गवराम गाडगे,पो.मा.झावरे,दादाभाऊ नवले उपस्थित होते.
सलग सात वर्ष वेगवेगळ्या विविध गटात संस्थेला “बँको” पुरस्कार प्राप्त होत आहे.संस्थेचे कार्यकारी संचालक स्व.दिलीपराव ठुबे यांनी केलेले नेटकेशिस्तबद्ध,सातत्यपूर्ण,विशसार्ह आर्थिक व्यवहार, आणि वाढते व्यवहार हे संस्थेचे मुख्य घटक आहेत.
हा गौरव कोरोनाच्या च्या कठीण काल खंडात ही सातत्यपूर्ण आर्थिकव्यवहार देणारे संस्थेचे सर्व संचालक,अधिकारी कर्मचारी,सभासद,हितचिंतक
यांना समर्पित करतांना समाधान वाटत आहे. उत्तम कामगिरी नंतर मिळणारे हे सन्मान सातत्यपूर्ण कामगिरी साठी प्रेरक आहेत अशी प्रतिक्रिया संस्थेच्या अध्यक्षा सुशिला ठुबे यांनी दिली.
संस्थेकडे ४२५ कोटी रूपयांच्या ठेवी असुन विविध शाखांमधुन २९० कोटी रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे विविध बँकामध्ये १८८ कोटी रूपयांची गुंतवणूक केली असल्याची माहीती कार्यकारी संचालिका नमिता ठुबे यांनी दिली.
from https://ift.tt/SpwdjX4