
पारनेर : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कान्हुर पठार पतसंस्थेची नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी सुशिला दिलीपराव ठुबे व उपाध्यक्षपदी पी.के.ठुबे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्रकुमार जोशी,सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड. माणिकराव मोरे,अॅड एम.डी.पवार,कार्यकारी संचालक गोपाळ ठुबे यांनी या बिनविरोध प्रक्रियेचे काम पाहीले.
यावेळी संचालक सुभाष नवले,राजेंद्र व्यवहारे,पो.मा.झावरे,संपत खरमाळे,भोमा ठुबे,गवराम गाडगे,भास्कर ठुबे,भगवान वाळुंज,सुहास शेळके,राजेंद्र रोकडे,मंगेश गागरे,दादाभाऊ नवले,मधुकर साळवे उपस्थित होते.
यावेळी सुशिला ठुबे म्हणाल्या
सभासद,खातेदार,संचालक मंडळ व कर्मचारी यांना सर्वांना सोबत घेऊन कान्हुर पठार पतसंस्थेचा कारभार करणार असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सुशिला ठुबे यांनी केले.स्व.दिलीपराव ठुबे यांनी घालुन दिलेला आर्थिक शिस्तीचा वारसा आम्ही सर्व पुढे नेणार आहोत.सहकार क्षेत्रात पतसंस्थेची प्रगती आम्ही सर्वांच्या सहकार्याने पुढे नेणार आहोत.
from https://ift.tt/3GBPLLj