एन. डी. पाटील चळवळीतील लढवय्ये नेते !

Table of Contents

कान्हूर पठार : शेती, राजकारण, समाजकारण याचा सखोल अभ्यास असणारे व शेतकऱ्यांच्या प्रश्‍‍नासाठी, हक्‍कासाठी काळ, वेळ, तहान-भूक हरपून काम करणारे एन.डी.पाटील हे चळवळीतील लढवय्ये नेते होते असे प्रतिपादन पारनेर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दादाभाऊ सोनावळे यांनी केले.
कान्हुर पठार(ता.पारनेर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर विद्यालयात संस्थेचे माजी चेअरमन व जेष्ठ नेते दिवंगत एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे उत्तर विभागाचे माजी निरीक्षक एस.पी.ठुबे, प्राचार्य बाबासाहेब वमने,उपशिक्षक ओमप्रकाश देंडगे,गोकुळ भागवत,संजय नवले उपस्थित होते.
एस.पी ठुबे म्हणाले,पाटील यांच्या निधनाने शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारा कणखर नेता महाराष्ट्राने गमावला. सरकार कोणत्याही पक्षांचे असो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आपली स्पष्ट मत मांडली. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.

from https://ift.tt/349hwwF

Leave a Comment

error: Content is protected !!