मुंबई :राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी परिस्थिती तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतील नव्या जगभराची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत वेगाने फैलाव होत असलेल्या या व्हेरिएंटला डब्लू जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन असे नाव दिले आहे. 
या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा लॉकडाऊनची भीती व्यक्त होत आहे. आता भारतातही निर्बंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.
जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहेत. तसेच या व्हेरिएन्टचा देशात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्याचा देशात शिरकाव होऊ नये यासाठी काही बंधनं लागू केले जाऊ शकतात, अशी स्थिती आहे, असे म्हणत अजित पवार यांनी पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात कोरोनाचा ओमिक्रोन व्हेरिएन्ट आढळून आला आहे. या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. तसेच याविषयी भारतात देखील एम्सने गंभीर इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून विदेशातून येणाऱ्या विमानांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
अजित पवार म्हणाले, ‘जागतिक पातळीवर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत आहे. याबाबद पंतप्रधान मोदी देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. हा नवा व्हेरिएन्ट राज्यात आला तर काही निर्बंध लावावे लागू शकतात असे अजित पवार म्हणाले. तसचे ‘आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत आणि 1 डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत’,अशी माहिती देखील यावेळी त्यानी दिली

from https://ift.tt/3DYjFs7

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *