उन्हाळ्यात भारतातील ‘ही’ ठिकाणं देतील सुट्टीचा सर्वोत्तम अनुभव!

Table of Contents

उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा आणि मजा मस्ती करण्याचा प्लॅन असले तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत…

1. पहलगाम : हे जम्मू आणि काश्मीरमध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे अवंतीपूर मंदिर, सारन हिल्स, ममलेश्वर मंदिर, पहलगाम गोल्फ कोर्स, कोल्होई ग्लेशियर, चंदनवारी, आणि काही तलाव पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
2. मनाली : हे पीर पंजाल आणि धौलाधर पर्वतरांगांवर असलेले लोकप्रिय हिल स्टेशन आहे. येथे मणिकरण साहिब, हिडिंबा मंदिर यासह अनेक सुंदर ठिकाण भेट देण्यासाठी आहेत.

3. शिमला : ही हिमाचल प्रदेशची राजधानी असून येथे भेट देण्यासाठी द रिज शिमला, मॉल रोड, जाखू हिल आणि मंदिर, सोलन यासारखी सुंदर ठिकाणं आहेत.
4. नैनीताल : हे उत्तराखंडमधील कुमाऊं टेकड्यांमध्ये वसलेले सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही नैनी तलाव, नैना देवी मंदिर, मॉल रोड, स्नो व्ह्यू पॉइंट, टिफिन टॉप यासह अनेक सुंदर ठिकाण भेट देण्यासारखी आहेत.

5. गंगटोक : हे सिक्कीममधील एक सुंदर ठिकाण असून येथे तुम्ही नाथूला पास, ताशी व्ह्यू पॉइंट, एमजी रोड, हनुमान टोक आणि रेशी हॉट स्प्रिंग्स पाहू शकता.

from https://ift.tt/n5WSjBZ

Leave a Comment

error: Content is protected !!