उद्यापासून उडणार महागाईचा भडका !

Table of Contents

विशेषतः इंटरनेट युजर्ससाठी डिसेंबरची सुरुवात चांगली नसणार आहे. कारण येत्या 1 डिसेंबरपासून जिओ रिचार्जसह एकूण 4 सेवा महागणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या मासिक खर्चावर होणार आहे. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात… 
● जिओ रिचार्ज प्लॅन : रिलायन्स जिओने आपल्या प्लॅनमध्ये येत्या 1 डिसेंबरपासून 20 टक्के वाढ झाली आहे. यामुळे JioPhone च्या 75 रुपयांच्या प्लॅन 91 रुपये होणार आहे. 129 रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन 155 रुपयांना मिळेल. तर 365 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत 2399 रुपयांऐवजी 2879 रुपये असेल.
● अमेझॉन प्राईम रिचार्ज : याच्या मेंबरशिप प्लॅनचे नवीन दर 14 डिसेंबरपासून देशभरात लागू होतील. प्राईम सबस्क्रिप्शन 50 टक्क्यांनी वाढल्यामुळे वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन 1499 रुपयांपर्यंत वाढेल, जो 999 रुपयांना होता. तीन महिन्यांच्या प्लॅनसाठी 329 रुपयांऐवजी आता 459 रुपये द्यावे लागतील. तर मासिक प्लॅन 129 रुपयांऐवजी 179 रुपयांचा असणार आहे. या वाढलेल्या किमतींचा अमेझॉन प्राईम सदस्यत्व योजनेसाठी ऑटो-नूतनीकरण पर्याय निवडलेल्या ग्राहकांवर होणार नाही.
● DTH रिचार्ज : येत्या 1 डिसेंबरपासून देशातील निवडक वाहिन्यांच्या किमती वाढणार आहेत. युजर्सना हे चॅनेल पाहण्यासाठी 50 टक्के जास्त किंमत मोजावी लागेल. स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारखे चॅनेल पाहण्यासाठी ग्राहकांना 35 ते 50 टक्के जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. सध्या या वाहिन्यांची सरासरी किंमत 49 रुपये प्रति महिना असून ती दरमहा 69 रुपयांपर्यंत वाढणार आहे. सोनी चॅनल पाहण्यासाठी 39 रुपयांऐवजी 71 रुपये प्रति महिना मोजावे लागतील. ZEE वाहिनीसाठी 39 रुपयांऐवजी 1 डिसेंबरपासून दरमहा 49 रुपये आकारले जातील. तर Viacom18 चॅनेलसाठी, तुम्हाला 25 रुपयांऐवजी 39 रुपये प्रति महिना मोजावे लागतील.
● SBI क्रेडिट कार्ड : येत्या 1 डिसेंबरपासून, SBI क्रेडिट कार्डसह खरेदी महाग होणार आहे. कारण, प्रत्येक खरेदीवर 99 रुपये आणि कर स्वतंत्रपणे भरावा लागणार आहे. हा प्रोसेसिंग चार्ज असेल.

from https://ift.tt/31aXVLj

Leave a Comment

error: Content is protected !!