आपण बरेचदा सर्व गोष्टी अस्तिक नास्तिकतेशी जोडतो आणि पुढच्या मनुष्याची लायकी ठरवतो.पण याही पलिकडे एक तिसरा वर्ग आहे जो याचा बरोबर स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी उपयोग करत असतो.त्याला वास्तविक समाज जोखडातून बाहेर पडावा असं वाटत नसतच.हे असच चालणार आहे आणि आपली विद्वत्ता आपण अशीच पाजळत रहाणार आहोत हे गृहीत धरुनच सर्व विद्वत्ता प्रदर्शन सुरू असते.
आपण अस्तिक असल्याने अथवा नास्तिक असल्याने कर्मशुद्ध होतील तर हे लायकीशी निगडीत येतच नाही.
माझे गुरुदेव म्हणतात, धर्म जोडता है।तोडता नही।। मी अमुक धर्म मानित नाही तमुक धर्म मानित नाही असं म्हणणारांनी मुळात धर्म म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं.धर्म माणसं जोडायला शिकवतो.नितीनं वागायला शिकवतो.
माऊलींनी धर्माविषयी फार सुंदर विधान केले आहे, येथं वडील जे जे करिती।तया नाव धर्मु ठेविती।तेचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ। मोठी माणसं जसं आचरण करतात त्यालाच धर्म म्हटलेलं आहे. आणि त्यानुसारच कनिष्ठ आपले जीवन व्यतीत करत असतात. म्हणजेच धर्म हा आचरणाशी संबंधीत आहे.आणि आचरण हे मानवतेशी निगडित आहे.धार्मिक म्हटलं की देवदेव करणारा असं चित्र आपण मनात तयार केलं असल्याने धर्म संहिता आपोआप लोप पावते. म्हणजे एखादी व्यक्ती खूप धार्मिक असेल अगदी अर्धा,अर्धा दिवस धार्मिक कर्मकांड करत असेल.पण त्याने स्वतःच्या आईवडीलांना घराबाहेर काढलं असेल,तो समाजासाठी काहीच उपयोगाचा नसेल,तो कुणालाही मदत करत नसेल,जाणिवपूर्वक लोकांना त्रास देत असेल तर ही धार्मिकता किती खरी आहे?
आता या उलट धार्मिक नसलेली व्यक्ती वरील सर्व दुर्गुण घेऊन जगत असेल तर त्याचही महत्त्व कितीसं आहे? म्हणजेच तुमच्या देव मानण्याचा अथवा न मानण्याचा समाजजीवनावर फारसा फरक पडत नाही.पण स्वतःच्या जीवनात मात्र फरक पडतो.देव भुताटकीच्या उलटसुलट चर्चा म्हणजे स्वरंजन किंवा मनोरंजना पलिकडे याला काहीच किंमत नाही.
तुकोबाराय म्हणतात,कर्मी कर्मठपणा धर्मीं धर्मिष्ठपणा।हीं दोन्ही अनुसंधानें चुकती जगी।।कर्माचे जे कर्म धर्माचा अधिधर्म।तो हा सर्वोत्तम विटेवरी।।

कर्म आणि धर्माची व्याख्या समजली नाही की मग जीवनाला विशेष बनवणारी ही साधना फलद्रुप होत नाहीत.श्रेष्ठ कर्मच मनुष्याला विशेष बनवतात.म्हणून कर्माचा कर्मसिद्धांत आणि धर्माचा अधिधर्म म्हणजे धर्मसिद्धांत ज्याला समजेल तो पांडित्य गाजवण्याच्या भानगडीत पडतच नाही.आणि हे सारं मिळवण्यासाठी त्या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठल तत्वाचा अंगिकार केला पाहिजे. तो सर्वोत्तम देण्यासाठीच उभा आहे.
स्वतःला धर्माच्या व्याख्येत बसवणं हेच मोठं आव्हान आहे.
टिका करुन समाजात सुधारणा होईल न होईल पण आपली टिका करण्याची हौस भागवण्याचा नवा धर्म उदयास येत आहे. असं का घडत आहे?तर समाज म्हणजे त्रयस्थ अशी भावना मनात घट्ट झाली आहे.दुसऱ्या मुलाने काही चुक केली,गैरवर्तन केलं तर आपण भावना व्यक्त करताना आपल्या जीभेला हाड रहातच नाही. पण स्वतःच्या मुलाने असं काही केलं तर त्याच जिभेत हाडं येतात.आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट हा नितीनियम झाला आहे.आपण दुसऱ्याच्या पोराला बाब्या म्हणत नाही तो पर्यंत समाज सुधारावा ही भावनाच निर्माण होत नाही. सर्व संतांनी तो भाव ठेवला म्हणून त्यांच्या टिकेतही आईचं ममत्व आणि बापाच्या भावना आहेत. तरीही संतांची धर्म शिकवणुक देण्याची तऱ्हा शरणागत होऊन आहे म्हणुन तेच म्हणु शकतात,सकळांचे पायी माझे दंडवत।नका करु नाश आयुष्याचा।।
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं।

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
यात जे देवपण साठलेलं आहे,यात जे सर्वोत्तम आहे ते समजलं की मग आपण उपदेशक होण्याइतकं काही मिळवलय का?उपदेशक होण्याचा निकष आपण काय ठरवला आहे?आपण कशाचा आणि किती त्याग केला आहे? की पोट भरलय म्हणून जिरवण्यासाठी हे आपण करतोय? असे प्रश्न नक्की उपस्थित होतात.अत्युच्च त्याग आणि श्रेष्ठ कर्माशिवाय श्रेष्ठत्व मिळत नाही.त्याला कोणताही शॉर्टकट नाही.कर्मानेच धर्मपरायण होता येईल.महाराज म्हणतात,न लगे चंदना पुसावा परिमळ।वस्पतीमेळ हकारुनी।। चंदनाला मी चंदन आहे अशी घोषणा कधीच करावी लागत नाही. हजारो वृक्षातही चंदनाचा सुगंध आम्हाला चंदनापर्यंत नेतोच.मनुष्य धर्मही असाच आहे. ज्याचा शब्द प्रमाण होतो तो चंदनाप्रमाणे शितल आणि सुगंधी झालेला असतो.त्या व्यक्तीच्या सहवासात ती शितलता आणि शुद्ध कर्माचा सुगंध अनुभवता येतो.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/3jTK2rb

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *