येत्या 26 मार्चपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. सध्या सर्वच संघ कसून तयारी करत असून स्पर्धेचे ब्रॉडकास्टर्स देखील आपला कॉमेंट्रीचा तगडा संच घेऊन सज्ज आहेत. विशेष बाब म्हणजे यंदाच्या हंगामासाठी एकूण 8 भाषांमध्ये कॉमेंट्री होणार आहे. त्यासाठी जवळपास 80 जणांचा संच तयार करण्यात आलाय.
तब्बल दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेसाठी अनुभवी, जुने-जाणते तसेच काही नवोदित व प्रतिभावान कॉमेंटेटर सज्ज आहेत. ज्यामध्ये हर्षा भोगले, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सुरेश रैना, आकाश चोप्रा, इरफान पठाण यासह अनेक दिग्गजांचा समावेश असणार आहेत.
एका अहवालानुसार, आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांना कोट्यवधींच्या घरात रक्कम मानधन म्हणून दिली जाते. जगभरातील लोक ऐकत असल्याने इंग्रजी भाषेतील कॉमेंट्री टीम सर्वाधिक पैसे घेते. त्याखालोखाल हिंदी तर सर्वात कमी मानधन हे स्थानिक भाषांतील कॉमेंट्रीसाठी दिले जातात.
यंदाच्या हंगामासाठी कमीत-कमी 2 कोटी ते जास्तीत-जास्त 7 कोटींपर्यंतचे मानधन कॉमेंट्री करणाऱ्यांना देण्यात येणार आहे. हर्षा भोगले, इयन बिशप, सुनील गावसकर, केविन पीटरसन, माइकल स्लेटर, साइमन डुल, डॅनी मॉरिसन यासारख्या अनुभवी कॉमेंटेटर्सना 5 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 3 कोटी 90 लाख रूपये मानधन देण्यात येणार आहे. मैदानात उभं राहून थेट डग आऊटमधून कॉमेंट्री करत असणाऱ्यांना सर्वाधिक म्हणजेच 7 कोटी इतकं मानधन मिळतं. यात स्कॉट स्टायरिस, ग्रॅम स्वान यांसारख्यांचा समावेश होतो.
हिंदी आणि स्थानिक भाषांतील कॉमेंटेटर्सना कमीत-कमी 70 लाख ते जास्तीत-जास्त अंदाजे 3 कोटी रुपये पगार दिला जातो. यामध्ये आकाश चोप्राला सर्वात जास्त 3.50 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 कोटी 66 लाख इतका पगार मिळतो. तर इरफान पठान व इतर कॉमेंटेटर्सना अंदाजे 2 कोटी ते 2.50 कोटी या रेंजमध्ये मानधन दिले जाते.

from https://ift.tt/4bW8uXq

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *