
पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या १० मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५१ सर्वधर्मिय विवाहाचे आयोजन करण्यात आले असून आमदार निलेश लंके कुटुंबीय कन्यादान करणार आहे. हंगा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात या शाही विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संसारपयोगी वस्तूसह इतर सर्व खर्च आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.
यासंदर्भात निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन यांनी नियोजनाबाबत आढावा बैठकीत सादर केला.या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजनासाठी हंगा येथे नियोजन बैठक पार पडली.यावेळी माजी सभापती सुदाम पवार ,उद्योजक अर्जुन भालेकर ,नगरसेवक अशोक चेडे ,दीपक लंके,बाळासाहेब खिलारी, नगरसेवक नितीन अडसुळ, कारभारी पोटघन मेजर, डॉ. बाळासाहेब कावरे,नंदकुमार औटी, नंदकुमार देशमुख, सचिन पठारे, दौलत गांगड, सरपंच राहुल झावरे, सरपंच बाळराजे दळवी, किशोर यादव, नंदू सोंडकर, सोमनाथ वरखडे, अमित जाधव,भाऊ चौरे, संदीप चौधरी, सत्यम निमसे, बाळासाहेब लंके, उमाताई बोरुडे, राजेश्वरी कोठावळे,पुनमताई मुंगसे,सविता ढवळे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
या विवाहासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असून आमदार लंके यांच्या बरोबर हे पवार कुटुंबीय कन्यादान करणार असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व निलेश लंके महिला कल्याणकारी संघटना यांच्या वतीने हा सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जात असून अवघ्या १ रुपयात हा विवाह करण्यात येणार आहे तर या सामुदायिक विवाहात सामिल होणाऱ्या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्यासह शाही विवाह सोहळा यावेळी आयोजित केला जाणार आहे. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कार्यकाळात अनेक गोरगरीब गरजू शेतकरी व पालकांच्या पुढे मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या कुटुंबियांना पर्याय म्हणून अवघ्या एक रुपयात आमदार निलेश लंके यांनी तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला आहे.
कोरोनाचे संकट व शेतीमालाला भाव नसल्याने अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहे तर दुसरीकडे अनेक वधूपिता वरपित्यांना कोरोना काळात विवाहाची चिंता सतावत असल्याने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करून एक छोटासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले. १० मार्चला सायंकाळी सात वाजता गोरज मुहूर्तावर या शाही विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सनई चौघडासह बँड बाजा डीजे व फटाक्यांची आतषबाजी या वधु- वरांच्या मिरवणूकी दरम्यान केली जाणार आहे.कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व इतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा सामाजिक उपक्रम आमदार निलेश लंके यांनी राबवला असून अनेक गोरगरीब व गरजूंना यामुळे निश्चित आधार मिळणार आहे.
निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने या सामुदायिक विवाह सोहळ्यात अंध अपंग १५ जोडप्यांचा विवाह करण्यात येणार असून या जोडप्यांना प्रत्येकी १ ग्राम सोने देण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या वतीने व निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे ११ अपंगांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात ११ व्हिलचेअर वाटण्यात येणार असल्याचे निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेने सांगितले आहे.
आमदार निलेश लंके वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह पार पडणार आहे. त्यामुळे या जोडप्यांना संसारपयोगी वस्तू सह मिष्ठान्न भोजन व सनई पासून डीजे पर्यंत संगीत वाद्य या सामुदायिक विवाह सोहळ्यात दिसणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य कन्यादान करणार आहेत.
from https://ift.tt/km5XgOu