
संत शिरोमणी सावता महाराजांनी केलेल्या अभंग रचना वरवर पहाता अत्यंत सुलभ सोप्या वाटतात.पण गुढार्थ कळाल्याशिवाय जीवनाचं तत्वज्ञान कळत नाही.प्रस्तुत अभंगात महाराज म्हणतात
आमुची माळीयाची जात ।
शेत लावूं बागाईत ॥१॥
आह्मा हातीं मोट नाडा ।
पाणी जातें फुलझाडा ॥२॥
शांति शेवंती फुलली ।
प्रेम जाई जुई व्याली ॥३॥
सावतानें केला मळा ।
विठ्ठल देखियला डोळा ॥४॥
शेती आणि शेतकऱ्यांशी निगडीत असलेला हा अभंग कर्मप्रधान न वाटला तरच नवल.शेतकऱ्याने शेतीधर्म पाळावा,उत्तम पिके घेत रहावी.हिच खरी भक्ती आहे. असा सरळ सरळ ,शब्दार्थ,वाक्यार्थ आहे.
लक्षार्थ समजून घेतल्याशिवाय ज्ञानाचं प्रगटीकरण होतच नाही.
आंतरिक आनंद सिद्धांतात लपलेला आहे. ज्ञानतृप्तीशिवाय सिद्धांत जगता येत नाही. दुसऱ्याचे अनुभव आमचं जीवन कसं काय सुखी करु शकेल?आमचा अनुभव काय आहे?आम्हाला अनुभवच आला नाही तर अभंग गाण्यापलीकडचा आनंद मिळणारच नाही.
माळी कोण आहे?,शेत कोणतं आहे?,मोट नाडा कोणता आहे?पिक काय घ्यायचं आहे?,सावता महाराजांनी केलेला मळा कोणता?,यातून विठ्ठल कसा पाहिला? या सर्व प्रश्नांवर आपण उद्याच्या भागात चर्चा. करु.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3Ah9DRO