
अर्जुन ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून तो पांडवांमधला तिसरा भाऊ होता. तो पंडूराजाचा आणि कुंतीचा पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता सांगितली. महाभारतातील कृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, नारदमुनी आणि धृतराष्ट्र यांनी मान्य केलेला तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर व अद्वितीय योद्धा होता. महाभारतात तोच एकटा अपराजित शूर होता.
कुरुक्षेत्रातील युद्धात कौरवांना पराजित करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.अर्जुन दूरदृष्टीने पहाणारा योद्धा होता.
युद्धात मदत मागण्यासाठी तो आणि दुर्योधन कृष्णाकडे गेले तेव्हा कृष्णाने मी लढणार नाही व दुसर्या बाजूला दहा हजार यादव लढवय्ये आहेत यापैकी कोण हवं आहे?असं विचारल्यावर अर्जुनाने लगेच कृष्णाची निवड केली. दुर्योधन आनंदाने योद्धे घेऊन गेल्यावर कृष्णाने कारण विचारल्यावर अर्जुन म्हणाला,मी सगळ्यांना जिंकू शकतो पण तू जेथे असशील तेथेच यश व कीर्ती असणार.
संजयाला धृतराष्ट्राने युद्धात कोण जिंकेल असं विचारल्यावर तो म्हणाला,
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥
जिकडे योगेश्वर कृष्ण व धनुर्धर पार्थ असतील, तेथे श्री, विजय, ऐश्वर्य आणि नीति ही अढळ आहेतच अशी माझी समजूत आहे.
इतका श्रेष्ठ विचार करणारा अर्जुन,आपण महाभारतात श्रवण केला.पण तो नेमका कोण?हे कळाल्याशिवाय आपल्या जगण्यात प्राण येत नाही.तो अर्जुन आमच्यातच आहे. अर्जुनाकडे अक्षयबाण भाता होता.म्हणजे त्यातले बाण कधी संपत नव्हते.आमच्याकडेही तो अक्षयभाता आहे.पण अर्जुन समजल्याशिवाय तो वापरता येत नाही.
सज्जनहो आमच्यातला ‘सत दृढनिश्चय’ म्हणजे अर्जुन आहे.आम्हाला जो पर्यंत डोळ्यासह मासा दिसतोय तो पर्यंत आम्ही अर्जुन होत नाही.अर्जुनाला त्या डोळ्याचा भेद घ्यायचा होता तेव्हा त्याला फक्त डोळा दिसत होता इतरांना डोळ्याबरोबर सभोवतालचं जगही दिसत होतं.आम्ही कोणत्याही क्षेत्रात यश संपादन तेव्हाच करु शकतो जेव्हा त्याशिवाय दुसरं काही दिसत नाही.विद्यार्थी प्रथम क्रमांकाने यश संपादन करणात तेव्हा ते अर्जुन झालेले असतात हे साध गणित आहे.आमच्या निश्चयात जेव्हा सत्य सोबत नसते तेव्हा अक्षयबाण भाता वापरता येत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.अर्जुन समजून घेतल्याशिवाय त्याला आमच्यात उपस्थित करता येत नाही. आपल्या सत्कर्मावरील श्रद्धा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे.कर्मातली श्रद्धाच देव होते.मग अचुक लक्ष गाठता येते.अर्जुनाकडे दयाबुद्धी होती.म्हणुनच त्याने आत्पस्वकिय पाहिल्यावर जगातल्या श्रेष्ठ धनुर्धारीने धनुष्य खाली ठेवले होते.आम्हाला गरजेनुसार दंभाचं धनुष्य खाली ठेवता येत नाही म्हणुन यश हुलकावण्या देतं.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3eUDWUm