आनंद तसा फारच महागडा शब्द. हा मिळवण्यासाठी लोकं काय,काय करतात!
पण अनेकांचे मार्ग अघोरी.
खरं तर आनंदात अघोरीपणा मोडतच नाही.आनंद हा निसर्गदत्त आहे.तो सहजावस्थेतूनच मिळणार आहे. पम सहजावस्था जीवनात निर्माण करणं भल्याभल्यांना जमत नाही. कारण आनंद मिळवण्यासाठी पत्करलेला मार्ग चुकीचा.
बरिचशी माणसं दुसऱ्याच्या प्रगतीने दुःखी होतात. अशी माणसं आयुष्यात कधीच निखळ आनंदाचं सुख मिळवू शकत नाहीत.
बरीचशी माणसं दुसऱ्याची प्रगती कशी रोखता येईल? यावर काम करतात. अशा माणसांच्या जवळ आनंद फिरकत सुध्दा नाही.
बरीचशी माणसं स्वतःचं धन खर्च करून दुसऱ्यांना अडचणीत आणतात. थोडक्यात काय ? तर यातून मिळणारा आनंद हा अघोरी आहे. पण या भानगडीत खऱ्या आनंदाला पारखी झालेली माणसं आनंदाला शोधत रहातात. पण तो अशा माणसांजवळ फिरकत सुध्दा नाही. शिवाय शरीरात घातक रसायनं तयार होतात.त्याचे पडसाद थेट चेहऱ्यावर दिसतात. अशा माणसांचे चेहरे पहा,ताणलेले असतात कायम,काळवंडलेले असताय कायम.बेगडी हास्य करत असतात कायम.
पण काळ फार बलवान आहे.तो पश्चाताप करायला वेळ देतो.सुधरायलाही वेळ देतो. पण सुधरता येईलच असं नाही. कारण अघोरीपणा करून किती आनंद मिळवलाय यावर ते अवलंबून आहे. मी हे कुठे वाचून लिहीत नाही बरका!हे अनुभवाचे बोल आहेत. मी ही अशा नंगाडांच्या संगतीत राहिलो आहे.पण काळानं मला संधी दिली.गुरुबोध झाला.निखळ आनंद कशाला म्हणतात, हे माझी गुरुमाऊली सदगुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी दाखवून दिलं.दुसऱ्यांना दुःख देणारा माणुस या भुतलावर आनंदी राहुच शकत नाही. हे ठणकावून सांगितले.
आनंदाच्या पुढची अवस्था गुरुमाऊलीने प्राप्त करून दिली.
“परमानंद”
आनंदापासुन वंचित असणारांना आनंद द्या.जीवनात हेच एक शाश्वत सुख आहे. ते जेवढ्या लवकर मिळवता येईल तेवढं तृप्ततेचं जीवन जगता येईल. अनावश्यक गोष्टी साठवण्याची वृत्ती नाहीशी होईल. बरोबर काहीच नेता येत नाही हे कितीतरी वेळा ऐकलय.आपण म्हणतो अगदी खरं आहे.पण खरच हे खरं आहे का?आपलं मन हे मानित नाही हेच खरं आहे. चला प्रयत्न तर करुन पा हु.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3qPRHKJ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.