
आतापर्यंत आपण चार कोशांचे होईल तितक्या सहज भाषेत चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे.पण या कोशाचं चिंतन करताना थोड्या जड शब्दांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. कारण ही तैत्तिरीय भाषा आहे. त्याचं सविस्तर वर्णन अनेक भाग चालेल.पण आपण तसे न करता दोन,तीन भागात हा कोश समजून घेण्याचा प्रयत्न करु.
चार शरीरांची माहिती यापूर्वी आपण पाहिली आहे. स्थुल,सुक्ष्म, कारण आणि महाकारण असे चार भाग आहेत. देहगुण विशेषणांनी ही नावे आली आहेत.
याप्रमाणें स्थूल शरीरांत एक, सूक्ष्म शरीरांत तीन आणि कारण – शरीरांत एक असें पांच कोश झाले आहेत. त्यापैकी पाचवा आणि शेवटचा कोश जो कारणदेहाशी संबंधित आहे. कारणशरीरांत जो मलिन सत्त्वांश आहे, तोच आनंदमय कोश.यात तीन प्रकारच्या वृत्ती आहेत.प्रिय, मोद आणि प्रमोद या त्या तीन वृत्ती आहेत.अर्थात याचा अर्थ आम्हाला समजून घ्यावा लागेल.
प्रियवृत्ती म्हणजे – इष्टदर्शनापासून होणारी.
मोदवृत्ती म्हणजे – इष्टवस्तूच्या लाभापासून होणारी.आणि प्रमोदवृत्ती म्हणजे इष्टविषयाच्या भागापासून उत्पन्न होणारी ती प्रमोदवृत्ती होय.
आत्मा त्या त्या कोशाच्या तादात्म्यानें त्या त्या कोशाशीं तन्मय होऊन गेला आहे.
या पंच कोशांपासुन अन्वय व्यतिरेकाचे योगानें आत्म्याचें विवेचन करुन, तो सच्चिदानंदरुप आहे,अशी मनुष्य बुद्धीला खात्री झाली असता तो ब्रह्मच होतो.
अन्वय म्हणजे एखाद्या गोष्टीचें किंवा स्थितीचें दुसर्याबरोबर असणें आणि व्यतिरेक म्हणजे तिच नसणें. ‘ अमुक गोष्ट असली तर अमुक असलीच पाहिजे ’ असा जो नियम त्यास अन्वय असें म्हणतात. आणि ‘ एक नसेल तर दुसरीही असणार नाहीं ’ या नियमास व्यतिरेक असें म्हणतात.
हे दोन नियम लावून पाहिले असतां दोन गोष्टींच्या सहभागाने किंवा कार्यकारणभावाने चांगला समजतो. आतां हे नियम आत्मविवेचनास लावून पाहिले असता,स्वप्नावस्थेंत स्थूल देह जो अन्नमय कोश याचें मुळींच भान नसून स्वप्न पाहणारा जो साक्षी आत्मा त्याचें भान असतें. म्हणून येथें स्थूल देहाचा व्यतिरेक असून आत्म्याचा अन्वय आहे. म्हणून आत्मा नित्य आणि स्थूल देह अनित्य असें अन्वयव्यतिरेकानें सिद्ध होते.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/7R8CqJr