
आता तुम्हाला प्रत्येकवेळी आधार केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्ही घरबसल्या अपॉईंटमेंट बुक करू शकता आणि आधार सेवा केंद्रावरील लांबलचक रांगा टाळू शकता. मात्र आधार अपडेटसाठी तुम्ही अपॉइंटमेंट कशी घेऊ शकता? याबाबत जाणून घेऊयात…
ऑनलाईन अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
● सर्वप्रथम https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा.
● त्यानंतर My Aadhaar वर क्लिक करा आणि book a appointment हा पर्याय निवडा.
● आता ड्रॉपडाउनमध्ये तुमचे शहर आणि स्थान निवडा.
● Proceed to book appointment या पर्यायावर क्लिक करा.
● मोबाईल नंबर टाका. ‘नवीन आधार’ किंवा ‘आधार अपडेट’ पर्यायावर क्लिक करा.
● Captcha एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा.
● OTP टाकून Verify वर क्लिक करा.
● पुराव्यासह वैयक्तिक तपशील आणि पत्ता करा.
● योग्य टाईम स्लॉट निवडा आणि Next वर क्लिक करा.
अशा पद्धतीने ऑनलाईन अपॉईंटमेंट प्रक्रिया पूर्ण होईल.
from https://ift.tt/3nU8HOf