
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. अशीवेळी राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री एका मागोमाग एक कोरोना पाॅझिटिव्ह येत आहेत. यातच आता. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. महादेव जानकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
महादेव जानकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशनमध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन जानकर यांनी केले आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल राज्यात तब्बल ४४ हजार ३८८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५ हजार ३५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
वैचारिक मतभेद असले तरी ; कुठलाही राजकीय वारसा नसताना “राष्ट्रीय समाज पक्ष” स्थापन करून इथल्या
“धनगर” बांधवासह बहुजनांना सत्तेची गणित उलगडून सांगणारा स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे राजकीय वारसदार मनाने “आभाळा” एवढा नेता..
साहेब कोरोनामुक्त होऊन बहुजनासाठी लढायला तयार व्हाल हीच जगदंबे चरणी प्रार्थना ….
रूपालीताई चाकणकर
अध्यक्षा, राज्य महिला आयोग
from https://ift.tt/3HTicVn