
जालना :’मी मोदीना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’ असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. काल दिवसभरात राज्यात आंदोलन केली आहे. पण आता मुद्याची लढाई गुद्यावर आली आहे. ‘नाना पटोलेंची जीभ छाटा 1 लाख मिळवा’ अशी घोषणाच जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसही आक्रमक झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जालना भाजप युमो चांगलीच आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी तर चक्क नाना पटोलेंची जीभ छाटून आणा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा, अशी वादग्रस्त स्कीम जाहीर केली आहे. जोगस यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार देखील दिली आहे.
तर दुसरीकडे, नाना पटोले यांचा पंजा छाटणार अशी भाषा करणाऱ्या अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दिलीप ऐडतकर यांनी केली आहे. ‘नानांनी लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेवावा, असे वक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले होतं.
तसेच, ‘सोनियांना गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत काँग्रेसमध्ये लागली आहे. नाना ने तर हद्दच केली आहे. मी मालकीनचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली, असेही अनिल बोंडे म्हणाले होते.
बोंडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अनिल बोंडे यांनी पाठवलेली पोर कुठपर्यंत आहे त्यांचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे त्यापूर्वी अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते दिलीप ऐडतकर यांनी केली.
त्यांना जर अटक झाली नाही आणि नाना पटोले यांना जर काही धोका झाला तर येथील पोलीस त्यांला जबाबदार असतील, नाना पटोले यांनी फक्त मोदींचा उल्लेख केला आहे त्यांनी नरेंद्र मोदी असा उल्लेख कुठेही केलेला नाही त्यामुळे भाजपने हे स्वतःच्या अंगावर घेवू नये, पोलिसांनी तात्काळ अनिल बोंडे यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसकडून अमरावती येथे करण्यात आली आहे.
from https://ift.tt/3A9lQI8