
मुंबई: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे काल निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी वाइन सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळेल
छोटे शॉपस निर्माण करून त्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वायनरी चालते. त्यांच्या प्रोडक्ट्सला चालना देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. सुपरमार्केटमध्ये एक स्टॉल म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे. तसा निर्णय झाला आहे. गोव्यात आणि हिमाचलात भाजपने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपने वाइन विक्रीचे धोरण स्वीकारले आहे. इथे मात्र विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
नव्या शैक्षणिक धोरणावर चर्चा
मंत्रिमंडळात नव्या शैक्षणिक धोरणावर चर्चा झाली. माशेलकर समितीने रिपोर्ट दिला होता. त्यावर चर्चा झाली. राज्यातील शिक्षण प्रणाली पाच विभागात आहे. आता मंत्रिमंडळाचा गट तयार करण्यात येईल आणि शिफारशींचा अभ्यास करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
from https://ift.tt/3AB4gwU