
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. दैनंदिन रुग्णवाढीमध्ये वेगाने वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबदरदारीचा उपाय म्हणून निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहे. राज्य सरकारने नवे निर्बंध लागू होत असल्याचे नमूद केले आहे.
राज्य सरकाच्या आदेशानुसार 10 जानेवारीपासून राज्यात नवे निर्बंध लागू होणार आहेत. यामध्ये लग्न सोहळ्यापासून ते इतर सार्वजनिक कार्यक्रम आणि अंत्यविधीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये लोकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याशिवाय कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार आहे.
असे असतील निर्बंध
१. सकाळी पाच वाजेपासून रात्री ११ पर्यंत ५ पेक्षा अधिक नागरिकांना प्रवास करून नये
अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत सर्व बंद राहील.
२. शासकीय कार्यालयात विभाग प्रमुखांची पूर्वपरवानगी आवश्यक
३. शासकीय कामासाठी गरज असल्यास व्हिडीओ कॉन्फरन्स पर्याय वापरावा
४. मुख्यालयाच्या बाहेरून येणाऱ्या सर्व व्यक्तींनी बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने घ्याव्यात
५. शासकीय कार्यालयात कमीत कमीत संख्येत काम करावे जास्तीत जास्त संख्येने घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे
६. संसर्ग रोखण्यासाठी वर्तन पाळावे त्याचे पालन हेड ऑफिसने करावे
७. थर्मल स्कनर, सॅनीटायझर गरजेचे
८. खासगी ऑफिससेस ५० टक्क्यांनी कमी करतील
९. खासगी ऑफिसेस सोयीस्कर वेळा ठरवाव्यात
१०. शिफ्टमध्ये २४ तास कामे करण्यास हरकत नाही
११. नियमित हालचाल ऑफिससाठी आवश्यक असल्यास ओळखपत्र बंधनकारक
१२. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी
१३. पूर्णपणे लसीकरण झालेल्या नागरिकांनी कार्यालयात यावे
१४ लग्नासाठी ५० नातलगांची उपस्थिती बंधनक्रारक
१५ .अंत्यविधीसाठी २० नागरिकांची उपस्थिती
१६ इतर सांस्कृतिक कार्यक्रम ५० नागरिकांची उपस्थिती
१७. शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारी पर्यंत बंद
१८. शाळा आणि कोचिंग क्लासेसने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरु ठेवावा
१९. कार्यालयीन कामकाज चालू राहील
२०. जिम, स्पा, स्विमिंग पूल, वेलनेस सेंटर, ब्युटी सलून पूर्णपणे बंद
२१. हेअर कटिंग ५० टक्क्यांनी सुरु राहतील.
२२. हेअर कटिंग सलून रात्री १० ते सकाळी ७ बंद राहतील करोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक
२३. क्रीडा स्पर्धा बंद
२४. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्वनियोजित असतील, त्यास प्रेषक नसतील आणि खेळाडू आणी कार्यालयीन स्टाफला बायोबबल गरजेचे असेल
२५. राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय खेळाडूंना भारत सरकारने नियम लागू
२६. दर तिसऱ्या दिवशी आरटीपीसीआर किंवा अँटीजेन बंधनकारक
२७. पार्क, झु, म्युझियम, किल्ले, पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद
२८. शॉपिंग मॉल मार्केट, कॉम्प्लेक्स ५० टक्क्यांनी सुरु राहतील .अँटीजेन टेस्ट करणे गरजेचे तर रात्री १० ते सकाळी ८ पूर्णपणे बंद
२९. हॉटेल्स, रेस्टारंट ५० टक्यांनी सुरु, लसीकरण गरजेचे, होम डिलिव्हरी सुरु राहील
३०. आंतरराष्ट्रीय प्रवास भारत सरकारच्या नियमाप्रमाणे लागू
३१. मालवाहतूक कार्गो वाहतूक, सार्वजिक वाहतूक केवळ लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या मार्फतच होईल
३२. स्पर्धा परीक्षा भारत सरकारच्या नियमाप्रमाणे लागू असतील
from https://ift.tt/3n9CkKR