
जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाखांची उपस्थिती.
पारनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून अळकुटीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले व जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली आहे.या मेळाव्याला प्रसंगी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी हे राहणार आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व बाजार समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षाच्या वतीने हे राज्यामध्ये अभियान सुरू करण्यात आले असून या समारोपा दरम्यान शिवसेना शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे. अळकुटीच्या मोरया मंगल कार्यालयात हा शिवसैनिकांचा भव्य मेळावा होणार असून पारनेर तालुका शिवसेना पूर्ण शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.या मेळाव्याला शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर व शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे हे पण उपस्थित राहणार असून यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण केला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांनी दिली आहे.
या शिवसंपर्क अभियानादरम्यान अळकुटी येथील दीड कोटी रुपयांच्या व्यापारी संकुलासह अंतर्गत गटार योजनेचे भुमीपुजन व दीड कोटी रुपयांच्या सहा ते सात बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा नामदार गुलाबराव पाटील व आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या नामदार गुलाबराव पाटील पारनेर मध्ये काय वक्तव्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी या शिवसंपर्क अभियान व शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पारनेर तालुका शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
from https://ift.tt/sNb3luO