
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. वरुन महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
महाराष्ट्र वसूली सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, अशा खोचक शब्दात अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे.प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरेंना अपघातानं झालेले मुख्यमंत्री म्हणत टीकास्त्र सोडलंय.
राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही प्रकाश जावडेकरांनी केला आहे.हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात जावडेकरांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जोरदार रंगू लागलाय.मी नवे नाव देतोय, महा विश्वासघातकी आघाडी सरकार, असं म्हणत जावडेकारांनी ठाकरे सरकारचं पुन्हा नव्यानं नामकरण केलंय.
अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिलं, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली, असं म्हणत नाव न घेता जावडेकर यांनी अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, 2 वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही. यातून मार्ग काढू शकतं ते आमचं सरकार. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे सरकार येणार. कधी येणार तेही आम्ही सांगणार नाही, असं दरेकर म्हणालेत.
from https://ift.tt/3D4bWHm