अबब… तब्बल 7 कोटी रूपयांच्या बनावट नोटा !

Table of Contents

मुंबई : बनावट नोटा तयार करण्याचे प्रकार काही नवीन नाहीत.मात्र एक नवीनच रॅकेट समोर आले आहे. थोड्या थिडक्या नाही तर तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे.मुंबईतील दहिसर भागात 7 कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबईतील दहिसर परिसरात क्राईम ब्रांचने धडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता.पण पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे.ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे.या आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मागील महिन्यातच औरंगाबाद मधील इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापल्याचा प्रकार समोर आला होता.संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. धक्कादायक म्हणजे, यापूर्वीदेखील बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर देखील झटपट श्रीमंत होण्यासाठी समरान ऊर्फ लक्की याने बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती. कारागृहातून सुटल्यावर समरान याने आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला.

मुकुंदवाडी येथे भाड्याच्या खोलीत समरान आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून सर्व आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 500 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश होता. यासोबतच पोलिसांनी घटनास्थळावरुन कम्प्युटर, प्रिंटर, कागद असा ऐवजही ताब्यात घेतला आहेत.

from https://ift.tt/3H8m198

Leave a Comment

error: Content is protected !!