
पुणे : ‘माझ्या मुलाला ताप येत असल्यास हे औषध द्या ‘ असे सांगून औषधाच्या बाटलीचा फोटो पोस्ट केल्याने नेटिझन्सचे ही डोळे पाणावले आहेत.
महाराष्ट्रात पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. अशातच पुणे येथे बालेवाडी परिसरात एका चार वर्षीय बालकाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलेले असून अद्याप देखील त्याचा शोध लागलेला नाही. स्वर्णव चव्हाण असे या बालकाचे नाव असून पुणे शहरातील वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये या मुलाचे फोटो व्हायरल केले जात असून सदर मुलाबद्दल काही माहिती असल्यास संपर्काचे आवाहन ( मोबाईल 9822223683 , 7448049927 , 7875200017 ) देखील केलेले आहे.
दि.११ जानेवारी रोजी मुलगा स्वर्णम याचे अपहरण अज्ञात व्यक्तींनी केले होते.
घटनेला तब्बल पाच दिवस उलटून गेले तरीदेखील अद्याप देखील या मुलाचा शोध लागलेला नाही. अपहृत बालकाचे कुटुंबीय यामुळे प्रचंड चिंतेत असून काही ठिकाणी मात्र या बालकाचा शोध लागलेला आहे, अशी अफवा पसरली आहे मात्र मुलाच्या वडिलांनी एक फेसबुक पोस्ट लिहून , ‘ कृपया आम्ही आमच्या बाळाचा अद्यापही शोध घेत आहोत तरी अफवा पसरवू नये. बाळाचा शोध लागल्यावर यासंदर्भात मी फेसबुक पोस्टवर सांगेन ‘, असे भावनिक आवाहन केलेले आहे.
पुण्यासारख्या शहरात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ एक व्यक्ती या मुलाला काळ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. त्याच्याच आधारावर तपास सुरू असून अद्याप तरी गुन्हेगारांना पकडण्यात आणि मुलाची सुखरूप सुटका करण्यात यश आलेले नाही.सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव चव्हाण याचं वय 4 वर्षं असून उंची 3 फुट आहे. बांधा सडपातळ असून केस काळ्या आणि सोनेरी रंगाचे आहेत. अपहरण झालं त्यावेळी त्यानं निळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली होती. तो मराठी आणि हिंदी भाषा बोलतो.
नागरिकांना अपहरणकर्ता किंवा स्वर्णव चव्हाण यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास ती पोलीस किंवा चव्हाण कुटुंबीयांकडे द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
from https://ift.tt/3rg1yZq