
पारनेर : आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे अपंग बांधव तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्या सौ.राणीताई निलेश लंके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे,डॉ.शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे.दिपक लंके, बाळासाहेब खिलारी,राहुल झावरे, कारभारी पोटघन मेजर, उद्धव भिसे, शैलेश औटी, सुनील करंजुले,वाळके मॅडम, अमित जाधव,सत्यम निमसे,मुकुंदा शिंदे, सुनिल चव्हाण, सतीश भालेकर.किरण ठुबे.राजू डहाळे दीपक मुळे, बाजीराव कारखिले, सुभाष कावरे, दत्ता शिंदे, संदिप ठाणगे,भानुदास आदी उपस्थित होते.
अपंग बांधव तपासणी शिबिरामध्ये २ हजार ५००अपंग बांधवांनी सहभाग नोंदवला होता या सर्वांची तपासणी यावेळी करण्यात आली.यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने मंडप व अपंग बांधवांसाठी चहा,नष्ट्याची सोय करण्यात आली होती.
आमदार निलेश लंके
पारनेर तालुक्यातील अनेक गरजू अपंगांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात आठवड्यातील बुधवारी जावे लागत आहे.त्यामुळे या अपंग बांधवांना हेलपाटे मारावे लागत होते त्यामुळे पारनेर तालुक्यात पहिल्यांदा अपंग बांधवांना हे प्रमाणपत्र मिळावे यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.
from https://ift.tt/3o960IU