
सतीश डोंगरे
शिरूर : जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या पाच वर्षाच्या दिपकने आज पहिल्यांदाच डोळे उघडले आणि किलकिलत्या नजरेने आजूबाजूचे दृश्य डोळे भरून पाहू लागला. त्यावेळी त्याच्यासह त्याच्या आई – वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
शिरूरच्या व्हिजन केअर सेंटर मधील डॉ.स्वप्नील भालेकर आणि डॉ.सोनल भालेकर यांच्या चमत्कारामुळे चिमुकल्या दिपकला आज नवी दृष्टी मिळाली.कर्नाटकातून मजुरी करण्यासाठी येथे आलेल्या एका गरीब दांपत्याचा दीपक हा ५ वर्षाचा मुलगा. त्याला लहानपणापासूनच दृष्टी नव्हती. गरिबीमुळे इलाज देखील करून घेणे शक्य नव्हते. आधार, रेशन कुठेच दीपकचे नाव नसल्यामुळे धर्मादायी रुग्णालयांमध्ये देखील इलाज होत नव्हता.
आज सकाळी शिरूर येथील डॉक्टर स्वप्नील भालेकर यांच्या व्हिजन केअर सेंटर मध्ये त्याच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केले. त्याला जेव्हा दिसायला लागले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हास्य ओसंडून वाहत होते. त्याच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही, असे डॉक्टर स्वप्नील भालेकर यांनी सांगितले.
दिपकच्या ऑपरेशनसाठी सर्व तयारी चोखपणे ठेवणारे आमचे व्हिजन केअर सेंटर चे सर्व कर्मचारी , त्याला अतिशय चांगल्या प्रकारे भूल देऊन आम्हाला ऑपरेशन मध्ये मदत करणारे माझे सहकारी भूलतज्ज्ञ डॉ. रविंद्र जाधव या सर्वांचे डाॅ. भालेकर यांनी यावेळी आभार मानले.
जिल्हापरिषदेच्या माजी सभापती सुजाताताई पवार , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी आणि इतर सर्व मान्यवर हे सर्व देखील या चिमुकल्याच्या आनंदात सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून शिरूर येथील व्हिजन सेंटर केअर मध्ये डोळ्यांच्या उपचारासाठी रुग्ण येत असतात. आतापर्यंत अनेकांना डाॅ. भालेकर दांपत्याने नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. एका गरीब कुटुंबातल्या चिमुकल्या दिपकला आज दृष्टी प्राप्त करून दिल्याबद्दल या डॉक्टर दाम्पत्यांवर संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
from https://ift.tt/3nWzCt5