पारनेर : गेल्या अडीच वर्षांमध्ये पारनेर नगर -विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाने कोटी कोटी उड्डाणे घेतली आहेत. या कालावधीमध्ये 500 कोटींपेक्षा जास्त निधी मतदारसंघात आणण्यात यश मिळाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवळपास शंभर कोटी रुपये मतदार संघाच्या विकासाच्या पदरात पाडण्यात यश आले आहे. त्यामुळे हा आकडा आता जवळपास सातशे कोटी रुपयांच्या आसपास जाईल असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. धोत्रे येथील विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ हा दुष्काळी पट्टा आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे आव्हान आमदार निलेश लंके यांच्या समोर होते. पारनेर आणि नगर तालुक्यातील चाळीस गावे असा हा मतदार संघ आहे. या भागांमध्ये विविध प्रश्न आणि समस्यांनी डोके वर काढले होते. दरम्यान आ. लंके यांच्या रूपाने सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आमदार झाला. जनसामान्यांसाठी झटणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केला. कोरोना काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाची महती सातासमुद्रापार पोहोचली. स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसेवा करणारा आमदार म्हणून त्यांना आज महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते. त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जवळपास दोन वर्ष हे कोरोना संकटांमध्ये गेले. त्यांनी सलग दोन वर्ष शरदचंद्रजी पवार आरोग्यमंत्री नावाने कोविड सेंटर चालवले. याठिकाणी 50000 रुग्णांना मोफत उपचार दिले . एकही कोरोना बाधित नागरिकाचा मृत्यू त्यांनी होऊन दिला नाही. यातून कोट्यावधी रुपयांचा वैद्यकीय खर्च या लोकप्रतिनिधीने वाचवला. कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात त्यांना यश मिळाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार त्यांच्याकडे पाठपुरावा करून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणण्याचे काम आमदार निलेश लंके यांनी केले. मतदारसंघांमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले. त्याचबरोबर गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना सुद्धा निधी मंजूर करुन घेण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात आली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याच्या अनुषंगाने जलसंधारणाच्यासाठी बंधारे आणि केटीवेअर गेल्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात बांधण्यात आले. दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मतदारसंघात निधी आणण्यात आला. अनेक स्मशानभूमींची दुरुस्ती त्याचबरोबर नव्याने बांधकाम करून ग्रामस्थांच्या मरणोत्तर यातना कमी केल्या. गावामध्ये काँक्रिटीकरण आणि पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले.
मतदार संघातील विविध गावांमधील शाळांची दुरुस्ती आणि नव्याने वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. तरुण पिढीला व्यायाम करण्याच्या अनुषंगाने व्यायाम शाळा बांधण्यात आल्या. पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. याशिवाय पर्यटन विकासाला चालना देण्यात आली. इतर अनेक कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला. काही कामे पूर्णत्वास आले असून काही प्रगतिपथावर आहेत. अनेक विकासकामांचे भूमिपूजन सुरु आहेत. मागील महिन्यात या सर्व कामांचा आढावा घेत असताना 500 कोटी रुपयांचा आकडा क्रॉस झाल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
अर्थसंकल्प अधिवेशनातही या मतदारसंघासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात यश मिळाले असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर आणखी काही प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विकास निधी चा आकडा सातशे कोटींवर जाईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. आणखी अडीच वर्षात प्रत्येक गावांमध्ये विकासाची गंगा पोहचवल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. असेही आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
▪मागील पंचवीस वर्षांची आकडेवारी काढा!
पारनेर मतदार संघातील मागील पंचवीस वर्षांची आकडेवारी काढा. त्या काळामध्ये जितका निधी आला. त्यापेक्षा दुप्पट निधी या मतदारसंघांमध्ये फक्त अडीच वर्षात आणण्याचे काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने करता आले याचा मनोमन आनंद आहे अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.
▪दुसऱ्याचा पोरग ते आमचं म्हणण्याची विरोधकांना सवय!
पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघात आपण अनेक विकास कामे मार्गी लावले आणि हाती घेतले. परंतु हे कामे आम्हीच आणले असे काही जणांकडून सांगितले जाते. दुसऱ्याचे पोरगं हे आमचेच आहे. असे सांगण्याची त्यांना सवय आहे. या तालुक्याचा आमदार मी आहे. मग निधी मी आणेल की पडलेले आणतील असा टोला आमदार निलेश लंके यांनी धोत्रे याठिकाणी लगावला.
▪धोत्रे गावात सव्वा चार कोटींची विकासकामे!
धोत्रे या गावामध्ये सव्वाचार कोटी रुपयांची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात निधी या गावासाठी देण्यात आला असून उर्वरीत कामे सुद्धा आगामी काळामध्ये मार्गी लावले जातील अशी ग्वाही आमदार लंके यांनी दिली.

from https://ift.tt/H9jaeJ3

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *