आपल्या अनेक इच्छा असतात.त्यापैकी काही पुर्ण होतात तर काही सोडून द्याव्या लागतात.प्रयत्न करुनही जेव्हा यश येत नाही तेव्हा ती गोष्ट मिळवण्याचा नाद सोडलेलाच बरा.जीवनात असे कितीतरी अनुभव प्रत्येकाकडे असतील.जी गोष्ट मिळवता आली नाही त्याचे दुःख करीत बसु नये.हा निसर्ग चक्राचाच एक नियम आहे.
तुकोबाराय म्हणतात,
महुरा ऐसी फळे नाही।आली काही गळती।।
पक्वदशे येती थोडी।नास आढी वेचे तों ।।
विरळा पावे विरळा पावे।अवघड गोवे सेवटाचे।।
फळ देणारा वृक्ष मोहर आल्यानंतर असं वाटतं की आता हजारो फळं येतील.पण तसं होत नाही. मोहराने डवरलेलं झाड तेवढी फळं देत नाही. त्यातला बराच मोहर गळुन जातो.जी फळं येतात त्यातही बरीच फळं लहान रहातात.फळ उतरवून ती आढीला गेल्यानंतरही अनेक फळं पिकत नाहीत,सडतात.
तसच आपल्या इच्छांचं आहे,
हजारो इच्छा मनात तयार होतात पण तेवढ्या पुर्ण होत नाहीत, काही विसरुन जातो,काही अपयशी ठरतात.सकळ्या अडथळ्यांतुन पार होणारी इच्छा वास्तवात उतरते.हे सत्य एकदा स्विकारले की मग यश अपयशाची चिंता रहात नाही.जे मिळालय त्याचा आनंद घेता येतो.कारण ते यश सगळे अडथळे पार करुन मिळालेले असते.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/jZRxCFf

By News

Leave a Reply

Your email address will not be published.