
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अखेर आज (सोमवारी) जबाब नोंदवण्यासाठी ईडी कार्यालयात दाखल झाले.
आज ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी दोन व्हिडीओ ट्विट करून आपले म्हणणे मांडले. त्यानंतर त्यांनी एक पत्रंही पोस्ट केले आहे. हे पत्रं कोणताही मंत्री, नेता, तपास यंत्रणा किंवा जनतेला उद्देशून लिहिलेले नाही.
मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मी आयुष्य जगलो आहे. त्यामुळेच माझ्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणतेही आरोप झालेले नाहीत. माझं आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखे आहे. त्यात काहीच लपवून ठेवलेले नाही, असे अनिल देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत
from Parner Darshan https://ift.tt/3jSjRRl