काही कारणाने आपण आपल्या आईबाबांना सोडून वेगळे रहात असाल तर….कारणं फार गंभीर नसतातच.शुल्लक वाद झालेले असतात.पण भविष्यात तुमच्यासाठी काय वाढवून ठेवलय हे जाणण्याची क्षमता तुमच्यात नाही.आयुष्यभर जे जीवन जगलात,तेच उत्तरार्धात जगायचय. मी पुर्वजन्मीच्या पापपुण्याचा हिशोब इथं मांडणार नाही. कारण तो विषय पुर्णत्वास न्यायला वेळेची समस्या आहे. असो…मी अध्यात्मिक बोलताना सविज्ञानच बोलेन,कारण युवकांनो अंधभक्त बनण्यापेक्षा,नास्तिक बरा.चला..मुळ विषयाकडे येऊ…
आईबाबांच्या इच्छेप्रमाणं वागणं कठीण झाल्याने वेगळ होणं.खरंतर ह्याला वेगळी किनार असतेच. आई माझ्या बायकोला समजावून घेत नाही,त्यांचं जमतच नाही. बहुतेक पुरुष बायकोच्या इच्छेप्रमाणं प्रपंच करण्यात धन्यता मानतात.यात गैर काहीच नाही. पण बायको परिवाराला सोबत घेऊन प्रपंच करण्यात इच्छुक नसेल तर वेगळं काय होणार?
माझ्या गुरुदेवांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली,एक महिला आपल्या जावयाचं गुणगान गात होती,माझा जावई इतका चांगला आहे,इतका चांगला आहे कि माझ्या मुलीला तो भांडे घासून देतो,कपडे धुवून देतो, स्वयंपाकातसुध्दा मदत करतो.मग त्या महिलेला विचारलं,आपली सूनबाई कशी आहे? तेव्हा ती म्हणते,काय सांगु माझा मुलगा लग्नाआधी शेर होता,या सटवीनं त्याचं मांजर करून टाकलय,तो भांडे घासतोय अन ही बया मोबाईलवर गेम खेळत बसते.काय बोलणार?
आपण जर आपल्या आईबाबांना कोणत्याही परिस्थितीत प्रेम देऊ शकला नाहीत, कारणं काहीही असो,आपला भविष्यकाळ आपण जे आयुष्यात कर्म केलं त्याची फळं सव्याज देण्यासाठी आतुरलेला आहे.मग दुरुस्ती करायला संधी नाही. हिच वेळ आहे,आईबाबांसह प्रपंच करण्याची.तुमची मुलं काही वेगळं करतील या भ्रमात राहु नका.आयुष्य तरी किती आहे?जगाना आनंदानं,आजाराशिवाय.जन्मदात्यांना वृध्दापकाळी न सांभाळणारा माणूस कसा असेल?तो अमानुषच.
युवकांनो तुम्ही आईबाबांसह कुटुंब सांभाळु शकलात तर तो खरा पुरुषार्थ आहे.ज्यांना हे जमणार नाही, त्यांनी पुरुषार्थाच्या गप्पा मारुच नये.अर्थात हे कौशल्य आहे.ज्यांना अशी इच्छा आहे,आईबाबांना सोबत ठेवायचं आहे,पण…..
हा पण संपावा वाटत असेल तर आपल्या मदतीला फिनिक्स सदैव तत्पर आहे.आणि हे सारं गोपनीय असेल.आज सांगायला लाजलात, कमीपणा वाटला तर एवढच लक्षात ठेवा.हा जन्म पुन्हा नाही,हे आईबाबा पुन्हा नाहीत, गेलेला क्षण पुन्हा नाही. कुटुंबवत्सल बना पण आईबाबांसह.आईबाबांच्या सेवेतच परमार्थ आहे.त्याशिवाय केलेला परमार्थ वांझ आहे. परमानंद प्राप्ती त्यात नाहीच.ते केवळ थोतांड होईल.
जय जय राम कृष्ण हरी🙏

from https://ift.tt/bMGRHjV

By News

Leave a Reply

Your email address will not be published.