महासागरांच्या अथांग खोलीत असणाऱ्या जलचरांमध्येच ‘जायंट सनफिश’ नावाच्या माशाचा समावेश होतो. या माश्याच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल, एवढं नक्की!
हा मासा माणसाप्रमाणेच सूर्यस्नान घेण्यासाठी किनार्‍यालगत उथळ पाण्यात येत असतो. यामुळे त्याला ‘सनफिश’ असे म्हटले जाते. हा मासा एकाच वेळी तब्बल तीस कोटी अंडी घालतो. या माशाला ‘कॉमन मोला’ किंवा ‘मोला-मोला’ या नावानेही ओळखले जाते.
अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या लगुना बीचवर हा मासा दिसून आला. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या माशाची लांबी 9 ते 10 फूट असण्याची शक्यता आहे. यातील मादी सनफिश एकाच वेळी तीस कोटी अंडी देऊ शकते. भूतलावर असणाऱ्या कोणत्याही प्रजातीमध्ये अंडी घालण्याचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.
एका रिपोर्टनुसार ऑक्टोबरमध्ये पकडण्यात आलेल्या या माशाची लांबी 10.5 फूट होती. तर वजन 2 हजार किलो होते. आता पुन्हा नुकताच हा सनफिश दिसून आला. रिच जर्मन आणि त्याचा मित्र मॅट व्हीटन हे बीचवर डॉल्फिन पाहण्यासाठी आले असता त्यांना हा मासा दिसून आला.
हा मासा आकाराने मोठा असला तरी तो अतिशय शांत असतो. किलर व्हेल आणि शार्कच त्याला आपली शिकार बनवू शकतात. हे मासे विशेषतः प्रशांत आणि अटलांटिक महासागरात अधिक प्रमाणात दिसतात. ते जेलीफिश, स्क्वीड आदींना आपली शिकार बनवतात.

from https://ift.tt/3ITBTOa

By News

Leave a Reply

Your email address will not be published.