भारतासह जगभरात उद्या 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जाईल. इतर देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आज त्याबाबत जाणून घेऊयात…
● इटली : या देशात हा दिवस ‘स्प्रिंग फेस्टिव्हल’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी येथील नागरिक एखाद्या गार्डनमध्ये जमा होऊन म्यूझिकचा आनंद घेतात.

● दक्षिण कोरिया : या देशात हा दिवस फेब्रुवारी ते मार्च दरम्यान साजरा केला जातो. 14 फेब्रुवारीला मुली जोडीदाराला चॉकलेट्स आणि गिफ्ट्स देतात. तर मुले 14 मार्चला जोडीदाराला रिटर्न गिफ्ट्स पाठवतात.
● ब्राझील : या देशात हा दिवस 12 जूनला साजरा होतो. या दिवशी जोडीदार एकमेंकाना गिफ्ट्स, चॉकलेट इत्यादी गिफ्ट्स देतात.
● दक्षिण आफ्रिका : या देशात महिला आपले प्रेम दर्शवण्यासाठी हातावर जोडीदाराचे नाव गोंदवतात. तसेच जोडपी आपल्या हातावर दिल देखील काढतात.

● फिलिपाईन्स : या देशात या दिवशी लोक सामुहिक विवाह करतात. यामुळे या दिवसाला ‘वेडिंग डे’ देखील म्हटले जाते.
● अमेरिका : या देशात जोडपे एकमेंकाना चॉकलेट, पुष्पगुच्छ देऊन आपल्या मनातले सांगतात.
● डेन्मार्क : या दिवशी मुले पार्टनरला कार्ड पाठवतात, ज्याला ‘जोकिंग लेटर’ म्हणतात. या कार्डावर पाठवणाऱ्याचे नाव नसते. मुलींना त्या व्यक्तीचे नाव ओळखायचे असते. जी मुलगी नाव ओळखते तिला ईस्टर एग दिले जाते.
● वेल्स : येथे 25 जानेवारीलाच हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुले-मुली एकमेंकाना लाकडाचे चमचे भेट देतात. या चमच्यांना ‘लव्ह स्पून्स’ म्हटले जाते. यावरच लोक प्रेमाचा संदेश लिहितात.
● जपान : हा दिवस केवळ मुलेच साजरी करतात. दरम्यान मुली वडील, भाऊ, पती, मित्र आणि प्रियकराचे आभार प्रकट करण्यासाठी चॉकलेट्स अथवा भेटवस्तू देतात.

from https://ift.tt/8lbDaKf

By News

Leave a Reply

Your email address will not be published.