यवतमाळ : अनेकांना सकाळ, दुपार, संध्याकाळी चहा हवाच.. मात्र तोच चहा चक्क कागदामध्ये उकळलेला असेल तर? तुम्ही म्हणालं असं कुठं असतं का? विश्वास बसत नसेल, तर जाणून घेऊयात…
यवतमाळच्या अब्बास भाटी या तरुणाच्या टी स्टॉलवर आलेल्या प्रत्येकाला कागदातला चहा दिला जातो. त्यामुळेच सध्या यवतमाळ जिल्ह्यात या चहाची चर्चा आहे. आर्णी तालुक्यातील कवठा बाजार या गावात अब्बासचा हा अनोखा टी स्टॉल पहायला मिळेल.
अब्बास चार काड्या घेऊन त्यामध्ये कागद लावून गंज तयार करतो. नंतर चार विटांची चुलीवर कागदाचा गंज ठेवून त्यात पाणी, दूध, साखर, चहा पत्ती, इलायची टाकतो. अखेर चुलीवर मस्त वाफाळलेला कागदावरचा चहा तयार होतो. अब्बासच्या या अनोख्या चहाची चव चाखायची असेल तर अब्बासच्या स्टॉलला भेट द्या.

By News

Leave a Reply

Your email address will not be published.