संत तुलसीदास म्हणतात,मुद मंगलमय संत समाजू।जो जग जंगम तीरथराजू।।राम भक्ती जहँ सुरसरि धारा।सरसइ ब्रम्ह विचार प्रचारा।।विधी निषेधमय कलि मल हरनी।करम कथा रविनंदनि बरनी।।हरि हर कथा बिजारती बेनी।सुनत सकल मुद मंगल देनी।।बटु बिस्वास अचल निज धरमा।तीरथराज समाज सुकरमा।।सबही सुलभ सब दिन सब देसा।सेवत सादर सुमन कलेसा।।अकथ अलौकिक तिरथराऊ।देइ सद्य फल प्रगट प्रभाऊ।।
संत तुलसीदास म्हणतात,संताचा समाज त्यांचं अस्तित्व म्हणजे कल्याण आणि सात्विक आनंद यांनी भरलेले एक जागतिक फिरते प्रयास क्षेत्रच आहे. तेथे रामभक्तीरुप भागीरथी अखंड वाहात असते.गुप्त सरस्वती म्हणजे ब्रम्हविचार.कलिमलाचे हरण करणारी विधीनिषेधमय आचार धर्मचर्चा हिच येथील यमुना नदी आहे. हरीहरकथा हाच त्रिवेणीसंगम आहे. स्वधर्मावरील अढळ विश्वास हाच वटवृक्ष आहे.
सत्कर्म हा या तिर्थराजाचा साजसंरंजाम आहे. आणि त्याचे फळ तात्काळ मिळते हे कोणासही प्रत्यक्ष अनुभवता येते.
संतसहवास त्यासाठी आवश्यक आहे. विकार निर्माण होणार आहेत ते स्वाभाविक आहे. पाणी उताराने आपोआप जाते.पण तेच पाणी चढावर न्यायचे असेल तर त्यासाठी पंपाची योजना आवश्यक असते.विकारी मनाला सतंसहवासाशिवाय परोपकरी होता येणं शक्य नाही.
प्रपंचात जगत विचार नाही. ब्रम्हज्ञानाची उकल तर नाहीच नाही. मी आणि माझं एवढच मर्यादित क्षेत्र आहे. संतसहवास व्यापक दृष्टी देतो.जगण्याचा मुळ हेतु कळतो.सत्संग त्यासाठी केला पाहिजे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3FsjntC

By News

Leave a Reply

Your email address will not be published.