माझ्या एका मित्राने वडील वापरीत असलेली खुर्ची त्यांच्या मृत्यूनंतर जपून ठेवली आहे. तो म्हणतो या खुर्चीशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. एका मित्राने आईच्या मृत्यूनंतर आईची साडी जपून ठेवली आहे. तो म्हणतो मी जेव्हा खूप अपसेट होतो तेव्हा आईची साडी अंगावर घेऊन झोपतो.माझं एकटेपण,ताणतणाव कुठल्या कुठे पळुन जातो.आईनं मला कुशीत घेतल्याचा भास मला होतो.
मी ही माझ्या आजीची काठी जपून ठेवली आहे. जेव्हा जेव्हा काठीचं दर्शन होतं तेव्हा तेव्हा आजीच्या आठवणी जाग्या होतात.मग आम्ही सारेच आजीच्या आठवणीत रमुन जातो.या आठवणी खूप काही आनंद देतात.आजी सोबत असल्याची संवेदना निर्माण होते.

सज्जनहो आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या आठवणी जपतो.त्यांची आठवण आम्हाला उर्जा देते.माणुसकी आपोआप जन्म घेत नाही. ती परंपरेने येते.कुटुंबाचा इतिहास कुटुंबाचं भविष्य सांगतो.ते कुटुंब किती परोपकरी आहे, सोशिक आहे, धार्मिक आहे किंवा ते किती माणुसघाणं आहे हे कुटुंबातील मागच्या पिढ्या सांगतात.
राष्ट्राचंही असच आहे. तिथल्या परंपरा,संस्कृती,सणवार हे एकाएकी तयार झालेले नसतात. त्याला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली असते.ते राष्ट्र त्या परंपरेवर उभं असतं.पुर्वजांनी केलेल्या पराक्रमाची ते साक्ष असतं.आपण घरातल्या व्यक्तीच्या आठवणी एवढ्या जपतो.त्यांची एखादी वस्तू जपून ठेवतो.आपल्या लहाणग्यांना सांगतो की हे बघ तुझे पंजोबा हे घड्याळ वापरत होते.किंवा त्यांचा फोटो त्याची साक्ष देतो.आपल्या पुर्वजांचे घरात फोटो ठेवण्यामागची हिच भावना आहे.

संस्कृती जतन असंच होत असतं.संस्कृतीतुनच संस्कार जन्माला येतो.
राष्ट्रप्रेमही असच जपलं जातं.थोर पुरुषांचे पुतळे यासाठीच उभारायचे असतात,मंदिरांचही जतन याचसाठी करायचं असतं.राममंदिर याचसाठी जपायचं आहे.अनेकांना वाटतं की काय त्या वाचुन खोळंबा आहे?काय गरज आहे?राष्ट्र शिल्लक राहिलं तर देवधर्म, कुटुंब आहे. राष्ट्रप्रेम आम्हाला सुरक्षित भावना प्रदान करते.आईबाप जवळ असतील तर लहान बाळ निवांत झोपी जाते.भारतदेश आपली आई आहे. म्हणून भारतमाता म्हटलं आहे.राष्ट्रभावना जपल्यानेच सांघिक प्रेम निर्माण होते.संकटात लढण्याची शक्ती सांघिक प्रेमातून तयार होते.
भारताला महान संस्कृतीचा वारसा आहे. तो आम्ही प्रत्येकाने जपायला हवा.तिचं जतन चार भिंतीच्या घरातुनच सुरू होतं.त्याची साक्ष आमचे पुर्वज आहेत हे कधीही विसरता कामा नये.घरात संस्कृती वारसा जपला तर आपोआप ती राष्ट्रभावना तयार होते.त्यातुनच मानवता जन्म घेते.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/3qlsQPk

By News

Leave a Reply

Your email address will not be published.