राहुरी : तालुक्यातील खुडसरगाव येथील ब्रम्हानंद महाराज विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी या संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे ऊर्जा व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे व माजी खा. प्रसाद तनपुरे व शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ब्रम्हानंद महाराज सोसायटी गेली २७ वर्षांपासून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राहुरी बाजार समितीचे संचालक रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. 
सन २०२२ ते २०२७ या वर्षासाठी १३ जागांसाठी १३ अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळात रमेशराव पवार, शांतिलाल रामराव पवार, युवराज रमेश पवार, ज्ञानेश्वर भगवान निशाणे, सोपान सूर्यभान निशाणे, अच्युत पोपटराव पवार, रामेश्वर कांतिलाल निशाणे, विनायक व्यंकटराव पवार, संदीप काशिनाथ होन, आप्पासाहेब रामभाऊ पंवार, भास्कर विश्वनाथ पठारे, सिंधुबाई भाऊसाहेब पवार व नंदूबाई अशोक पवार आदींचा समावेश आहे.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गोरक्षनाथ निशाणे, भाऊसाहेब पोपटराव पवार, भरत निशाणे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयातील एन. डी. खंडेराय व संस्थेचे सचिव चंद्रभान पवार यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध होणसाठी संस्थेचे सर्व सभासद व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. बिनविरोध निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

from https://ift.tt/WKhTob2Gp

By News

Leave a Reply

Your email address will not be published.