प्रापंचिक कचाट्यात सापडणं काय असतं,हे फक्त तेच जाणू शकतात, ज्यांनी याचे फटके खाल्ले आहेत. एखाद्याने गाठून मारावं,अशी ही अवस्था असते. पण हे बरेच वेळा दृष्यमान नसतच.माणसं जळत असतात, आतल्याआत. कुणाला सांगताही येत नाही. आणि सहनही होत नाही.अशी माणसं बाहेरून अक्कडबाज,रूबाबदार दिसतात.ऐटीत चालताना दिसतात.एव्हाना अशी माणसं जरा जास्तच काळजी घेतात,स्वतःची दैना लपवण्याचा.
मुळात प्रपंच हा ना श्रीमंताचा सुखाचा आहे ना गरिबाचा.प्रपंचात अर्धीअधिक माणसं दुसऱ्याचं चांगलं का चाललय? याचा अभ्यास करण्यात बरचसं आयुष्य घालतात.पण माझं चांगलं चालण्यासाठी हा अभ्यास अपायकारक असल्याचं त्याला जाणवणं हे काही योगायोगानं होणार नाही.

मग प्रपंच सुखाचा नाहीच का कुणाचा?
आहे तर.अनेक असे परिवार आहेत, जे आनंदानं तो करत आहेत,कचाट्यात न सापडता.
त्यासाठी कुठल्याही अध्यात्मिक कर्मकांडात पडण्याची गरज नाही. कोणत्याही वाऱ्या करण्याची गरज नाही, आणि अध्यात्मिक गोष्टी सांगणाऱ्यांच्या तर अजिबात नादी लागण्याची गरज नाही. ती केवळ एक दुकानदारी बनली आहे.
मुळात आध्यात्मिक गप्पा मारणारांनाच ते कळालं नसल्याचं प्रत्ययास येत आहे.अध्यात्म म्हणजे ओळखावे आपणासी आपण.यापेक्षा वेगळा अर्थ घेणारांचं काही खरं नाही. स्वत्वाचा शोध. बाहेरची शोधाशोध काहीच देऊ शकणार नाही.माझं मनुष्यजन्मात कर्तव्य काय?
उत्तर सोपं आहे. माणूस म्हणून जगता येणं.माणूस म्हटलं कि माणूसकी आलीच.त्याशिवाय जगणारी माणसं प्राण नसलेल्या मुर्द्यासारखीच.

संत हे खऱ्या अर्थाने सांयटिस्ट आहेत.त्यांनी मानवी मनाचा वेध घेतला आणि मनुष्य काय केल्याने सुखाचं जीवन जगु शकतो,हे ग्रंथ रूपाने शब्दबद्ध केलं.पण चाललय भलतच.आपल्या कुकर्माने प्रापंचिक कचाट्यात अडकायचं,मग सुटण्यासाठी, व्रतवैकल्ये, उपवास,वाऱ्या, अन्नदान,तिर्थाटनं,अध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन इ. फारच विद्वान असेल तर टुरवर जाईल, प्रपंच विसरण्याचा प्रयत्न करील.पण कुठवर?परत माघारी येणं आहेच. पण खरं आनंदाचं शास्त्र किती सहज आणि सोपं!
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा।।हे तुकोबांचं ब्रम्हवाक्य प्रापंचिक कचाट्यातून सुटण्यासाठी पुरेसं आहे. दुसऱ्याचा प्रपंच सुखी केला की आपला आपोआप होतो.फिनिक्स या सेवेसाठी संधी शोधत असते.हे तत्व समजणारी मंडळी फिनिक्स चालवत आहे.रंजल्या गांजलेल्यांची सेवा करत आहे. आणि देवदर्शन करत आहे.हे खुप सुंदर आहे. अनुभव घ्या.आपल्या आसपास रहाणाऱ्या गोरगरिबांना हसवा,मदत करा. परत प्रापंचिक कचाट्यात आपण सापडणारच नाही.

या अज्ञात शक्तीचे किती आभार मानावेत?आपण सर्वांना चुकवून केलेलं वाईट,चांगल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतच.काही चतुरांना कळतं की हे भोग आपण केलेल्या वाईट कृत्याचे आहेत.पण कोण बोंबलुन चव घालेल? निमुटपणे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाताना आपल्याला सुध्दा अनेक विद्वान दिसतील,पण आपण याहून वेगळे झालेलो असलो तर…….
जय जय राम कृष्ण हरी

from https://ift.tt/FkJv5mO

By News

Leave a Reply

Your email address will not be published.