‘रिलायन्स’चे सर्वेसर्वा, उद्योजक मुकेश अंबानी यांचे नाव आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आवर्जून घेतले जाते. अंबानी कुटुंब महागडे कपडे, दागिने आणि बिग बजेट लग्न सोहळे या सर्व गोष्टींमुळे सतत चर्चेत असते.
आपल्या लाईफस्टाईलमुळे मुकेश यांची पत्नी नीता अंबानी चर्चेत असतात. दरम्यान एका रिपोर्टमधून नीता या जगातील सर्वांत महागडे पाणी पित असल्याचे समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, नीता अंबानी जे पाणी पितात, त्याच्या 750 मिली एका बॉटलची किंमत $60,000 अर्थात भारतीय चलनात 44 लाख रुपये एवढी आहे. हे पाणी ‘Acqua di Cristallo Tributo a Modigliani’ नावाच्या कंपनीचे आहे.
या कंपनीची सर्वात स्वस्त पाण्याची बॉटल $285 डॉलर म्हणजेच 21,355 रूपयांना मिळते. या बॉटलमधील पाणी फ्रान्समधले किंवा फिजीमधले असते. असे सांगितले जाते की, 5 ग्रॅम सोन्याचा भस्म या पाण्यामध्ये मिसळलेला असतो, हे भस्म शरीरासाठी फायदेशीर आहे. या बॉटलची पॅकेजींग लेदरची असते.
2010 साली ‘गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये Acqua di Cristallo Tributo a Modigliani’या कंपनीचे नाव नोंदवले गेले होते. फर्नांडो अल्तामिरानो (Fernando Altamirano) यांनी या कंपनीच्या पाण्याच्या बॉटलचे डिझाईन केले आहे. जगातील सर्वांत महाग बॉटलची डिझाइन फर्नांडो अल्तामिरानो यांनी कॉग्नाक ड्युडोगनॉन हेरिटेज हेन्री IV तयार केलीय.

from Parner Darshan https://ift.tt/30v0g3m

By News

Leave a Reply

Your email address will not be published.