शिर्डी: ‘सबका मालिक एक’ अशी ख्याती असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर थर्टी फस्ट म्हणजेच येत्या 31 डिसेंबरला बंद राहणार आहे. नव्या वर्षात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साईसंस्थानाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे साईभक्तांचा हिरमोडच झाला आहे. थेट 1 जानेवारीला सकाळी सहा वाजता शिर्डीचं साई मंदिर उघडणार आहे. 
दरवर्षी 31 डिसेंबरच्या भक्तांच्या सोयीसाठी रात्रभर साईमंदिर खुले ठेवले जात होते. यावर्षी मात्र निर्बंधामुळे साईमंदिर बंद राहणार आहे. साईमंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून तसा निर्णय जाहीर केला आहे.पहाटेची काकड आरती व शेजारतीमध्ये भाविकांना प्रवेश मिळणार नाही. साईबाबा मंदिरातील लाडू केंद्र, प्रसादालयदेखील बंद ठेवले जाणार आहे.
संचारबंदीमुळे मंदिरातील वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच कॅन्टनची सुविधाही भाविकांसाठी बंद राहणार आहे. शिर्डीच्या श्री.साईबाबा संस्थानने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार प्रसादालयात एकाच वेळी एक हजारांहून अधिक भाविक प्रसाद भोजन करतात. मात्र, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरविण्यात आले आहे.

from https://ift.tt/31cG076

By News

Leave a Reply

Your email address will not be published.