प्रदूषण, थंड हवामान, धुकं अशा त्रासदायक वातावरणात जर तुम्ही मॉर्निंग वॉक किंवा रात्रीच्या वेळा चालायला जात असाल तर, स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता. त्यापासून वाचण्यासाठी नक्की कशी काळजी घ्यायची? पाहूयात…
● सकाळी चालल्याने ताजी हवा शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करते. रक्तप्रवाह उत्तम राहतो. यामुळे आजारांशी लढा देण्यास मदत होते.
● हिवाळ्यात सकाळच्या कोवळ्या उन्हात चाला, जास्त फायदा होईल.

● सकाळी वॉकला जाताना थंडीपासून रक्षण करणारे स्कार्फ, मोजे, ग्लोव्हज असे उबदार कपडे घाला. यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहिल.
● सकाळी वॉकला जाऊन आल्यावर कोमट पाणी प्या. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहील.
● सकाळचं धुकं, गार हवा यामुळे सर्दी होऊ शकते. अस्थमा, फुफ्फुसांचे त्रास होऊ शकतात. ज्यांना असे त्रास होण्याची शक्यता आहे त्यांनी बाहेर जाण्याआधी काळजी घ्यावी किंवा घरातच व्यायाम करा.
● शारीरिक दुखापत झाली असेल तर चालणे टाळा. पहिल्यांदा वॉकला जाणार असाल तर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालू नका.
● कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी चालायला जा. कारण नियमित मॉर्निंग वॉक केल्याने कॉलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात राहतो.
● सकाळी लवकर उठून चालण्याची सवय लावल्यास रात्री झोपही चांगली लागते. तसेच दिवसभर फ्रेश वाटते.
● वाढत्या वयाबरोबर सकाळी किमान अर्धा तास चालल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहते.
काही उपयुक्त टिप्स पाहूयात…
● चालताना शरीराचे पोश्चर सरळ ठेवा. तोंडाऐवजी नाकाने श्वास घ्या.
● शक्यतो सकाळी कोवळ्या उन्हात फिरायला जा.
● सकाळी चालण्यासह काही वेळ धावणेदेखील उत्तम व्यायाम आहे.
● मॉर्निंग वॉकदरम्यान जास्त पाणी पिणे टाळा.
● सकाळी चालायला सुरुवात करताना अगोदर चालण्याची गती सामान्य ठेवा आणि मग हळूहळू त्यामध्ये वाढ करा.

from https://ift.tt/qeGMJBSrb

By News

Leave a Reply

Your email address will not be published.