ज्ञानेश्वरीविषयी फार वेगळे बोलण्याची गरज नाही. अज्ञानासाठी हे फक्त एक पुस्तक असेल.माऊली म्हणतात,
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । आणि अज्ञानासी आन गांवो । म्हणौनि बोलावया विषय पहा हो । विशेषु नाहीं ।।
त्याप्रमाणे ज्ञानवानांना हा ग्रंथ भोगण्याचा विषय आहे आणि अज्ञानांना तर हा ग्रंथ अगदी अनोळखीचे ठिकाण आहे, म्हणून पहा, ह्याविषयी फार बोलण्याचे कारण नाही.
परी अनुवादलों मी प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ॥६-३१॥

परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो. ते संतानी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे सांगितले ते सांगतो. ॥
तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणौनि बोलीं विपायें सांपडे । परी श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें । देखैन मी ॥
ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठिण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल. तरीपण माझे गुरु निवृत्तिनाथ, यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन व सांगेन. ॥
जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥
जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही, ते डोळ्यांशिवाय पहाता येते. ॥
ना तरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे । जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥

दैववशात जर परीस हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. ॥
तैसी गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे । म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥
त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा प्राप्त होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही ? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यावर ती कृपा अलोट आहे. ॥
तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन । अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥
त्या सद्गुरूकृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन व म्हणून माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी करीन. ॥६-३६॥
या ओव्या मुद्दामच या ठिकाणी दिल्या आहेत. ज्ञानेश्वरीचे सामर्थ्य आपणास कळाले तरच ती वाचण्याचा मोह होईल. आत्मशांतीकडे जाणाऱ्या प्रत्येकाने एकदा ज्ञानेश्वरी अभ्यासली पाहिजे. माऊली म्हणतात, माझ्या गुरुंच्या कृपेने इंद्रीयांना अगोचर असणारे ज्ञान तुम्हाला इंद्रियांद्वारे गोचर करण्याची जादु ज्ञानेश्वरीत अनुभवास येईल.म्हणून माझी त्या सर्वांना विनंती आहे जे आत्मशांतीकडे जाऊ इच्छितात.ध्यान पद्धती शिकु इच्छिणारांनी आजपासून नियमित शक्यतो पहाटे जमेल तशी एमेल तेवढ्या ओव्या वाचण्याचा प्रयत्न करावा.मी जच ध्यानधारणा क्रिया आपणास सांगणार आहे तिचे मुळ ज्ञानेश्वरी आहे. आपणास ही कला लवकर प्राप्त होण्यासाठी हे कराच.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/SUui9Q0mt

By News

Leave a Reply

Your email address will not be published.